SP Vasant Jadhav Transfer : आमदारांवर गुन्हा दाखल करणे पडले महागात, जिल्हा पोलीस अधीक्षकांची तडकाफडकी बदली

author img

By

Published : Jul 28, 2022, 8:19 PM IST

Replacement of Vasant Jadhav

भंडाऱ्याचे जिल्हा ( Bhandara District ) पोलिस अधीक्षक वसंत जाधव ( Superintendent of Police Vasant Jadhav ) यांची आज तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. आमदार नरेंद्र भोंडेकर ( MLA Narendra Bhondekar ) यांनीच ही बदली करवून घेतल्याचे बोलले जात आहे. ही बदली ( Replacement of Vasant Jadhav ) राजकीय सुडबुध्दीने झाल्याची चर्चा भंडऱ्यात सुरू आहे.

भंडारा - भंडाऱ्याचे जिल्हा ( Bhandara District ) पोलिस अधीक्षक वसंत जाधव ( Superintendent of Police Vasant Jadhav ) यांची आज तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. ही बदली ( Replacement of Vasant Jadhav ) राजकीय सुडबुध्दीने झाली असल्याची चर्चा सुरू आहे. अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर ( MLA Narendra Bhondekar ) यांनीच ही बदली करवून घेतल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे बदली केली असली तरी, त्यांच्या नियुक्तीचे ठिकाण अजूनही ठरलेले नाही. जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक कोण हेही स्पष्ट झालेले नाही. जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून कार्यकाळ पूर्ण न होता वसंत जाधव यांची झालेली बदली ( Replacement of Vasant Jadhav ) अनेक चर्चांना वाव देणारी आहे. पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाल्यापासून सर्वांच्या सहकार्यातून पोलिस दलाचा गाडा यशस्वीरित्या हाकत असताना आज अचानक आलेले बदलीचे आदेश सर्वांसाठीच आश्चर्याचा धक्का आहे.

Vasant Jadhav was hastily replaced
वसंत जाधव यांची तडकाफडकी बदली झाली

आमदारांवर गुन्हा दाखल करणे पडले महागात - शिंदे-फडणवीस याचे सरकार हे विकास कामे करण्यासाठी एकत्रित आले की सूडबुद्धीने काम करण्यासाठी एकत्रित आले का असा प्रश्न उपस्थितीत झाला आहे. एका प्रकरणात आमदारांवर गुन्हा दाखल करणे त्यांना महागात पडले आहे. जानेवारी २०२१ ला कोरोना काळात शालेय शुल्कावरून भंडाऱ्यातील एका शाळे संदर्भात पालकांच्या तक्रारीवरून आमदार भोंडेकर यांनी पालकांसोबत शाळेत जाऊन जाब विचारला होता. तेव्हा शाळा व्यवस्थापन तसेच भोंडेकर यांच्यात प्रचंड वाद झाला होता. सदरील प्रकरण मारहाणी पर्यंत गेले होते. या प्रकरणात पोलिसांनी आमदार भोंडेकर यांच्या विरोधात ( Filing case against MLA Narendra Bhondekar ) कलम १४३, १४७, १४८, ५०४, ५०६, ३२३ मुंबई पोलिस कायदा १३५ नुसार गुन्हा नोंद केला होता. तेव्हापासून पोलिस अधीक्षक वसंत जाधव तसेच भोंडेकर यांच्यात वाद सुरू होता.

राजकीय द्वेषातून बदली? - आमदार भोंडेकर यांनी मागील अधिवेशनात पोलिस अधीक्षकांची तक्रार करून कारवाईची मागणी केली होती. भोंडेकर शिंदे गटाचे आमदार असल्याने पोलीस अधीक्षकांची बदली होईल याची सतत चर्चा होत होती. मात्र, अशा पद्धतीने बदली होईल याची कोणी कल्पना ही केली नव्हती. गुरुवारी अचानक बदलीचा आदेश आल्याने सर्वांना हा धक्काच होता. महाराष्ट्रात केवळ एकाच व्यक्तीची सक्तीची बदली केली गेली. अधिकाऱ्यांच्या बदल्या हा प्रशासकीय भाग असतो. त्या पद्धतीने त्या झाल्यास त्याची चर्चा होत नाही. मात्र, काहीही कारण नसताना झालेली ही बदली नक्कीच राजकीय द्वेष सांगण्यास पुरेशी आहे. दरम्यान यासंदर्भात आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी ही बदली पोलीस विभागाच्या प्रशासकीय कामाचा भाग असून राजकीय द्वेष नाही, असे स्पष्ट केले.

हेही वाचा - Chandrashekhar Bawankule : स्टंटबाजी करू नका, आता शिंदे-फडणवीसांचे सरकार; चंद्रशेखर बावनकुळेंचा सज्जड दम

नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया - बदलीनंतर लोकांमधून संतप्त प्रतिक्रिया ही येत आहेत. जिल्हा पोलीस दलाचा कारभार व्यवस्थित सुरू असताना झालेल्या या बदलीवर नाराजी व्यक्त होत आहे. अशा पद्धतीने एखाद्या कारवाईसाठी बदल्या होणार असतील तर, प्रामाणिक अधिकाऱ्यांनी काम कसे करावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. विकास कामासाठी लोकांनी आमदार नरेंद्र भोंडेकर यांना निवडून दिले मात्र, निवडून आल्यानंतर सर्वांगीण विकास सोडून वैयक्तिक भांडणात त्यांना रस असल्याचे आजच्या बदली प्रकरणातून स्पष्टपणे दिसत आहे.

हेही वाचा - Sushma Andhare joins Shiv Sena : कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा, सुषमा अंधारेंनी घेतले शिवबंधन हाती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.