Bhandara Library Gunshot जुन्या भांडणाचा काढला वचपा, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची ग्रंथालयात गोळीबार करून हत्या

author img

By

Published : Sep 4, 2022, 3:26 PM IST

Updated : Sep 4, 2022, 4:54 PM IST

भंडारा ग्रंथालय गोळीबार

मागील दोन वर्षांपासून सुरू असलेल्या उच्चशिक्षित तरुणांच्या वादाचे रूपांतर शेवटी हत्येत ( Student Shot Dead Bhandara ) झाले. भंडारा शहरातील मध्यभागी असलेल्या हेडगेवार चौकातील स्व. अण्णाजी कुलकर्णी अभ्यासिकेत ( Late Annaji Kulkarni library Bhandara ) शिरून हा गोळीबारात झाला असून यामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा अतुल वंजारी (रा. गणेशपूर) याचा मृत्यू झाला ( Student shot dead in library Bhandara ) आहे. या प्रकारात आरोपी गंगाधर निखारे (रा. पवनी) याला पोलिसांनी अटक केली आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या हत्येनी शहर हादरून गेले आहे.

भंडारा : मागील दोन वर्षांपासून सुरू असलेल्या उच्चशिक्षित तरुणांच्या वादाचे रूपांतर शेवटी हत्येत ( Student Shot Dead Bhandara ) झाले. भंडारा शहरातील मध्यभागी असलेल्या हेडगेवार चौकातील स्व. अण्णाजी कुलकर्णी अभ्यासिकेत ( Late Annaji Kulkarni library Bhandara ) शिरून हा गोळीबारात झाला असून यामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा अतुल वंजारी (रा. गणेशपूर) याचा मृत्यू झाला ( Student shot dead in library Bhandara ) आहे. या प्रकारात आरोपी गंगाधर निखारे (रा. पवनी) याला पोलिसांनी अटक केली आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या हत्येनी शहर हादरून गेले आहे. आरोपीने जुन्या भांडणाचा वचपा ( shootout to avenge old feud Bhandara ) काढत अतुलवर गोळीबार केल्याचे समोर आले आहे.

रोहित मतानी, पोलीस अधीक्षक भंडारा

गोळी पाठीतून छातीपर्यंत पोहचली - शहरातील हेडगेवार चौकात असलेल्या स्व. अण्णाजी कुलकर्णी अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी अनेक विद्यार्थी येत असतात. गणेशपूर येथील 30 वर्षीय अतुल बाळकृष्ण वंजारी हासुध्दा नियमित अभ्यासासाठी यायचा. आजही 3 सप्टेंबर रोजी तो अभ्यास करत असताना 3.30 वाजताच्या सुमारास पवनी येथील गंगाधर नारायण निखारे (वय 40 वर्षे ) ही व्यक्ती अभ्यासिकेत पोहचली आणि त्याने अतुलशी वाद घालण्यात सुरुवात केली. यादरम्यान गंगाधरने जवळ असलेला देशी कट्टा काढला. संभाव्य धोका ओळखून अतुलने पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र आरोपी गंगाधरने अतुलवर गोळी झाडली. गोळी अतुलच्या पाठीतून छातीपर्यंत पोहचली. गंभीर अवस्थेत त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले.


पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल- घटना घडताच अतूलसह अभ्यासिकेत असलेल्या तरुणांनी अन्य लोकांच्या मदतीने आरोपी गंगाधरला पकडून ठेवले. घटनेची माहिती होताच भंडाराचे पोलिस निरीक्षक सुभाष बारसे ताफ्यासह अभ्यासिकेत पोहचले व आरोपीला ताब्यात घेतले. घटनेची माहिती होताच मोठ्या प्रमाणावर लोकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलिसांनी यावेळी अभ्यासिकेकडे जाणारे सर्व मार्ग सुरक्षिततेच्या दृष्टीने बंद केले होते. घटनास्थळावरून पोलिसांनी देशी कट्टा जप्त केला. घटनेची माहिती कळताच जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतानी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अनिकेत भारती, यांनी घटनास्थळी भेट दिली.


आरोपी आणि मृतक दोघेही उच्च शिक्षित- मृतक आणि हत्या करणारी व्यक्ती यांनी या अगोदर एकमेकांवर गुन्हे दाखल केलेले आहेत. दोघांवरही भंडारा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. 2020 पासून या दोघांमध्ये वाद सुरू होते. अतुल वंजारी याच्याविरोधात 354 (अ)(ड) कलमानुसार गंगाधर निखारे याच्या पत्नीच्या तक्रारीवरून तर अतुल वंजारी याच्या तक्रारीवरून गंगाधर निखारे यांच्याविरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहेत. आरोपीने मृतकाला मारण्यासाठी नागपूर वरून देसी कट्टा सहा महिन्याअगोदरच खरेदी केला होता. आज पवनी वरून हत्या करण्याच्या उद्देशानेच त्याने भंडारा शहर गाठले. वाढदिवसाच्या दिवशी झालेल्या घटनेमुळे शहर चांगलाच हादरलेला आहे. गोळ्या झाडून हत्या करण्याची ही भंडारा शहरातील पहिलीच घटना आहे. जुन्या वैमनस्यातून ही हत्या झाली असून आरोपी आणि मृतक दोघेही उच्च शिक्षित आहेत. आरोपीला अटक केली असून पुढील तापस सुरू आहे असे पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांनी सांगितले.

Last Updated :Sep 4, 2022, 4:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.