Culture of Vidarbha : ग्रामीण भागातील सर्वात लोकप्रिय सण मंडई; मंडईनिमित्त जोपासली जाते लोककला

author img

By

Published : Nov 24, 2021, 11:40 AM IST

लोकप्रिय सण मंडई

मंडईची सुरुवात ही शेतकर्‍यांनी वर्षभर केलेल्या कष्टातून एक दिवसाचा शारिरीक विश्राम मिळावा दंडार, गोंधळ, भारुड, नाटक या सारख्या कार्यक्रमातून त्यांना मानसिक उत्सहा मिळावा तसेच नवीन नाते संबंध जोडण्यासाठी या मंडईच्या आयोजनाला सुरुवात केली गेली असल्याचे सांगितले जाते. आजही मंडईच्या दिवशी मुला मुलींचे लग्न जोडण्याचे कार्य पार पाडले जाते.

भंडारा - दिवाळीनंतर ग्रामीण भागात सर्वाधिक ज्या सणाची गावकरी आतुरतेने वाट पाहतात तो सण म्हणजे मंडई (Mandali). मंडई म्हणजे लोककला (Folk art of Vidarbha) जिवंत ठेवण्याचा सण, मंडई म्हंटलं तर गावात जत्रा, मंडई म्हंटलं तर कामानिमित्त बाहेरगावी असलेल्या प्रत्येक कुटुंबीयांना घरी परत येण्यासाठी हक्काचा सण. तसेच मंडई म्हणजे नवीन नाते संबंध जोडण्यासाठी आणि वर्षभर केलेल्या कष्टातून एक दिवस स्वतःला आनंदित उत्साहित ठेवण्यासाठी असलेला सण म्हणजे मंडई अशी व्यापक व्याख्या या मंडळीची केली जाऊ शकते.

ग्रामीण भागातील सर्वात लोकप्रिय सण मंडई

दंडार, तमाशा, गोंधळ यासारख्या लोककला (Culture of Vidarbha) -

दरवर्षी दिवाळीनंतर (Diwali) गावोगावी मंडळीचे आयोजन केले जाते. प्रत्येक गाव त्यांच्या सोयीनुसार या मंडईचे आयोजन करतो. मंडईमध्ये दंडार, तमाशा, गोंधळ, स्थानिक नाटक यासारख्या लोककलेच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे काम दरवर्षी केले जाते. संपूर्ण वर्षभरामध्ये स्थानिक कलाकार (Local artists) आपल्या कलेचे सादरीकरण करण्यासाठी मंडई चे आयोजनाची मोठ्या आतुरतेने वाट पाहतात. सध्यातरी या आधुनिक युगात या लोककलांना जिवंत ठेवण्यासाठी मंडळी हा सण अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडतो आहे.

लोकप्रिय सण मंडई
लोकप्रिय सण मंडई

जत्रेनिमत्त पाहुण्यांचे होते आगमन -

ज्यादिवशी गावात मंडई असते त्यादिवशी विविध साहित्यांची खरेदी-विक्री केली जाते. घरगुती वस्तू, अत्यावश्यक वस्तू, खाद्यपदार्थांचे दुकाने जागोजागी थाटले जातात. प्रत्येकजण घरून नवीन कपडे घालून बाजारात मोठ्या प्रमाणात त्यांच्या गरजेनुसार वस्तूंची खरेदी करताना दिसतात. या दिवशी प्रत्येक घरात नातेवाईकांचा जमावडा असतो. त्या दिवशी गावात जणू जत्राच (Jatra) भरते. तसेच दिवाळीचे महत्त्व सर्वांना ठाऊक आहे. ग्रामीण भागात दिवाळी पेक्षा मंडई या सणाची सर्व गावकरी आतुरतेने वाट पाहत असतात आणि त्यामुळेच ज्या दिवशी गावात मंडई असते त्यादिवशी कामानिमित्त गावाबाहेर राहत असलेले कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती घरी परततो. घरासमोर रांगोळी घातली जाते. घर सजवले जाते. आणि खरी दिवाळी ही मंडईनिमित्त साजरी केली जाते.

जत्रेनिमत्त पाहुण्यांचे होते आगमन
जत्रेनिमत्त पाहुण्यांचे होते आगमन

थकवा दूर करण्यासाठी सुरू झाली प्रथा -

मंडईची सुरुवात ही शेतकर्‍यांनी वर्षभर केलेल्या कष्टातून एक दिवसाचा शारिरीक विश्राम मिळावा दंडार, गोंधळ, भारुड, नाटक या सारख्या कार्यक्रमातून त्यांना मानसिक उत्सहा मिळावा तसेच नवीन नाते संबंध जोडण्यासाठी या मंडईच्या आयोजनाला सुरुवात केली गेली असल्याचे सांगितले जाते. आजही मंडईच्या दिवशी मुला मुलींचे लग्न जोडण्याचे कार्य पार पाडले जाते.

जत्रेनिमित्त गावात दुकानं लावतात
जत्रेनिमित्त गावात दुकानं लावतात
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.