DOCTORS DAY: सैनिक-पोलीस-शेतकरी-अनाथांची मोफत शुश्रूषा; सर्वांनाच मोफत सेवा देण्याचा 'या' डॉक्टरांचा मानस

author img

By

Published : Jul 1, 2021, 7:51 AM IST

DOCTOR DAY: 'Giving free services to the needy brings mental satisfaction' - dr. atul tembhurne

भंडारामध्ये जन्मलेले आणि बारावीपर्यंत भंडारामधून शिक्षण घेतलेल्या डॉ. अतुल टेंभुर्ने यांनी नागपूर मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस केले. तर पुण्यामधून एमएस झाले. ते अस्थिरोग तज्ज्ञ आहेत. त्यांनी समाजातील गरजवंत लोकांना मदत करावी. या इच्छेने 2016 पासून ते मोफत तपासणी करत आहेत.

भंडारा - आपण समाजाप्रती काही देणे लागतो. समाजातील गरजवंत लोकांना मदत करावी. या इच्छेने 2016 पासून, भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर अतुल टेंभुर्ने अनाथ बालक, 70 वर्षावरील वयोवृद्ध नागरिक, पोलीस, सैनिक आणि शेतकरी यांची मोफत तपासणी करीत आहेत. 2022 पासून सैनिक आणि त्यांच्या कुटुंबांना मोफत शस्त्रक्रिया आणि उपचार देणार आहेत. 2025 पासून भंडारा जिल्ह्यातील सर्व नागरिकांना तपासणीसाठी पैसेच द्यावे लागणार नाही. असा मानस त्यांनी निर्धारित केलेला आहे.

DOCTOR DAY: 'गरजवंतांना मोफत सेवा देऊन मानसिक समाधान मिळते' - डॉ. अतुल टेंभुर्ने

सहा हजार लोकांची त्यांनी मोफत तपासणी -

भंडारामध्ये जन्मलेले आणि बारावीपर्यंत भंडारामधून शिक्षण घेतलेल्या डॉ. अतुल यांनी नागपूर मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस केले. तर पुण्यामधून एमएस झाले. 2013 मध्ये त्यांनी भंडाऱ्यात प्रॅक्टिस सुरू केली. सोबतच शासकीय दवाखान्यात ही ते सेवा देत आहे. देशाचे निस्वार्थपणे रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी काहीतरी करावे असे त्यांना नेहमीच वाटायचे. त्यामुळे याची सुरुवात त्यांनी त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रापासून केली. 2016 मध्ये त्यांनी त्यांच्या रुग्णालयात वायु सेना, स्थल सेना, जल सेनेच्या सैनिकांना तसेच त्यांच्या कुटुंबांना मोफत तपासणीचे कार्य सुरू केले. हे सुरू असताना समाजातील अनाथ बालके, 70 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, जिल्ह्याचे संरक्षण करणारे पोलीस, आणि देशाचे खेळांमध्ये नाव करणारे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू, आणि कर्ज घेतलेला किंवा बीपीएल शेतकरी यांना त्यांनी मोफत तपासणी सुरू केली आहे. आतापर्यंत सहा ते सात हजार लोकांची त्यांनी मोफत तपासणी केली आहे.

2025 पासून जिल्ह्यातील सर्वच नागरिकांना मोफत तपासणी -

पुढच्या वर्षी म्हणजे 2022 पासून सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना केवळ मोफत तपासणी नाही तर शस्त्रक्रिया आणि संपूर्ण उपचार ही मोफत करणार आहेत. तसेच 2025 पासून जिल्ह्यातील सर्व नागरिकांना तपासणीसाठी खिशातील एक रुपये खर्च करावा लागणार नाही. असे ध्येय त्यांनी निर्धारित केला.

मानसिक समाधान आणि लोकांचा आशीर्वाद -

हे सर्व करून तुम्हाला नेमके काय मिळते. असे जेव्हा अतुल यांना विचारले, तेव्हा ते म्हणाले की, मला यातून मानसिक समाधान मिळते. जसजसे माझ्या डोक्यावरील कर्ज कमी होतो आहे. तसतसे मी नागरिकांसाठी चांगले कार्य करून त्यांचा आशीर्वाद मिळविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

सर्वच डॉक्टर चुकीचे नसतात -

डॉक्टर हा देव असतो तो लोकांचे प्राण वाचवतो असे उद्गार डॉक्टरांबद्दल बोलली जाते. मात्र कधीकधी एखाद्या डॉक्टरने केलेल्या चुकीच्या कामामुळे डॉक्टर व्यवसायिक झालेत असाही समज निर्माण झाला आहे. खरे तर कॉर्पोरेट हॉस्पिटल आणि आरोग्य विमा यांच्यामुळे मोठ्या प्रमाणात बिल निघत आहेत. तरी एकटा प्रॅक्टिस करणाऱ्या स्पेशलिस्ट डॉक्टरचा उपचार अजूनही स्वस्तच आहे. प्रत्येक डॉक्टर त्यांच्या शैक्षणिक अनुभव आणि त्यांच्याकडे असलेल्या सुविधांच्या नुसारच नागरिकाला वाचविण्याच्या आणि त्यानुसार पैसे घेण्याचा प्रयत्न करतो. त्यांनी एखाद्या डॉक्टरमुळे सर्वच डॉक्टर चुकेचे आहेत असा समज नागरिकांनी करू नये. एवढेच डॉक्टर दिनी सांगू इच्छितो. असे त्यांनी म्हटले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.