woman raped by three men : ३५ वर्षीय महिलेवर तीन नराधमांचा बलात्कार

author img

By

Published : Aug 6, 2022, 1:12 PM IST

Updated : Aug 6, 2022, 6:25 PM IST

woman raped by three men

एका ३५ वर्षीय महिलेवर (A 35 year-old woman ) तीन नराधमांनी ( raped by three men) बलात्कार (Gang Rape) करून तिला रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याची धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्यात उघडकीस आली आहे. एका पुलाजवळ एक महिला विवस्त्र अवस्थेत पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला आहे.

भंडारा: गोंदिया जिल्ह्यातील महिलेवर मदतीच्या बहाण्याने गोंदिया आणि भंडारा या दोन जिल्ह्यात सामुहिक अत्याचार झाल्याची घटना पुढे आली आहे. पिडीतेला आधी गोंदिया जिल्ह्यात अत्याचार करण्यात आला नंतर भंडारा जिल्ह्यात सोडण्यात आले तर भंडारा जिल्ह्यातील कन्हाळमोह परिसरात महिलेवर पुन्हा दुसऱ्या दोन नराधमाणे अमानुष पद्धतीने अत्याचार केल्याचे समोर आले आहे. महिलेची प्रकृती नाजूक असून नागपुरातील मेडिकलमध्ये तिच्यावर उपचार सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

बलात्कार प्रकरणी माहिती देताना पोलीस अधिकारी

गोंदिया जिल्ह्यत झाला पहिला अत्याचार: ही महिला गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील रहिवासी आहे. तीला पतीने सोडून दिलेले आहे. ती तिच्या बहिणीच्या घरी राहायची. ३० जुलै रोजी तिचा बहिणीसोबत किरकोळ वाद झाला. रागाच्या भरात तिने घर सोडले आणि माहेरी जाण्यासाठी निघाली. पायी जात असतांना एका नराधमाणे मदतीच्या बहाण्याने आपल्या चारचाकी मध्ये बसविले आणि त्यानंतर तिच्यावर तब्बल दोन दिवस बलात्कार केला. ३१ जुलै रोजी पळसगाव येथे अत्याचार करून जंगलात सोडून दिले.

धाब्यावर पुन्हा दोघांचा अत्याचार : जंगलात भटकत ही महिला १ ऑगस्ट रोजी भंडारा शहराजवळील कान्हालमोह येथील धर्मा ढाबा येथे आली. तिला एकटी पाहून एक व्यक्ती तिच्याजवळ आला. ‘घरी नेऊन सोडतो,’ असे म्हणाला. पण, महिलेला त्याच्यावर विश्वास बसला नाही. तेव्हा दुसऱ्या व्यक्तीने विश्वास दिल्यावर महिला सोबत जाण्यास तयार झाली. त्यानंतर पहिल्या व्यक्तीसोबत दुचाकीवर बसून महिला निघाली. पण, दोघांनीही तिच्यावर शेतात नेऊन अत्याचार केला. नंतर तिथेच सोडून दोघांनीही पळ काढला.



संपूर्ण रात्र विवस्त्र अवस्थेत: अत्याचारानंतर रात्रभर पीडिता तशीच पडून होती. अत्याचारामुळं तिने शुद्ध गमावली होती. कन्हाडमोह येथे रात्रभर ती वेदनेने विव्हळत होती. त्याचवेळी गावातील तरुणांचे तिच्याकडे लक्ष गेले. गावकरीही तिच्या मदतीसाठी धावले. पोलिसांनाही या घटनेची माहिती दिली. महिला विवस्त्र होती व वेदनेने कण्हत होती. पोटापासून पायापर्यंत रक्ताने शरीर माखले होते. आरोपींनी पीडितेच्या गुप्तांगावर धारदार शस्त्रांनी गंभीर जखमा केल्या. त्यामुळे पीडितेच्या गर्भाशयापर्यंत जखम झाली आहे. प्रचंड रक्तस्त्रावामुळं महिलेची प्रकृती चिंताजनक आहे.

नागपूरात उपचार : अत्याचार पीडित महिलेला सुरुवातीच्या उपचारासाठी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले मात्र पीडितेची प्रकृती नाजुक असल्याने तिला नागपूर येथील नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. पीडिता वारंवार तिची शुद्ध हरपत आहे. महिलेला मेडिकलमध्ये आणले त्यावेळी ती बेशुद्धावस्थेत होती. तिला प्रचंड रक्तस्राव होत होता. त्यामुळे तिच्यावर तातडीने एक शस्त्रक्रिया करण्यात आली. आणखी एक शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. सध्या तिला मेडिकलच्या अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले.


दोन नराधमांना अटक : सुरुवातीला कारधा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र पिढीता ही गोंदियाची असून पहिली घटना ही गोंदियात झाली होती त्यामुळे आता हा गुन्हा गोरेगाव पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आलेला आहे. या प्रकरणात भंडारा जिल्ह्यातील दोन आरोपींना अटक केली असून सुरुवातीला अत्याचार करणाऱ्या गोंदिया येथील नराधमाचा सध्या पोलीस शोध घेत आहेत.

हेही वाचा : Girl Sexually Abused : बापलेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना;अल्पवयीन मुलीवर बापानेच केला अत्याचार

Last Updated :Aug 6, 2022, 6:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.