Farmer Died By Electric Shock: रानडुकरांपासून बचावासाठी लावलेल्या संरक्षण जाळीला चिकटून आष्टीत तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

author img

By

Published : Jul 29, 2022, 8:22 PM IST

Dead Amol Narvade

रानडुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी लावलेल्या संरक्षण जाळीला विद्युत प्रवाह सोडला होता. त्याच्या संपर्कात आल्याने तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू ( Farmer Died By Electric Shock ) झाला. आष्टी तालुक्यातील बीडसांगवी येथे ही दुदैवी घटना घडली. ( Death of a young farmer in Ashti )

आष्टी ( बीड ) - रानडुकरांपासून डाळिंब बागेचे नुकसान होऊ नये यासाठी लावलेल्या विद्युत संरक्षण जाळीला चिटकून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला. शुक्रवार 29 जुलै रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात ही घटना ( Death of a young farmer in Ashti ) घडली. हा तरुण शेतकरी पाहणी करण्यासाठी गेला असता विद्युत प्रवाह लावलेला लक्षात न आल्याने याच संरक्षण जाळीला चिकटून त्याचा जागीच मृत्यू ( Farmer Died By Electric Shock ) झाला. अमोल माणिक नरवडे (वय 30 वर्ष) असे त्या मृत शेतकऱ्यांचे नाव आहे.

विद्युत प्रवाह बंद करण्याचे विसरला आणि झाला अपघात - आष्टी तालुक्यातील बीडसांगवी येथे घराच्या काही अंतराला लागूनच डाळिंब बाग आहे. या ठिकाणी रानडुकरांचा मोठा उपद्रव असतो. बागेचे नुकसान होत असल्याने शेतकर्‍याला मनस्ताप सहन करावा लागतो. रानडुकरांपासून बचाव व्हावा म्हणून संरक्षण जाळीला विद्युत प्रवाह सोडला होता.

परिसरात हळहळ : शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता माणिक नरवडे यांचा मुलगा अमोल माणिक नरवडे (वय 30 वर्ष) हा बागेची पाहणी करण्यासाठी गेला होता. विद्युत प्रवाह बंद करण्याचे विसरल्याने तो शेतात शिरला असता विद्युत प्रवाह असलेल्या संरक्षण जाळीला चिकटून त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे्ही वाचा -- Breaking: One Died In Firing At Shiv Sena Branch : शिवसेना शाखेसमोर गोळीबार, गोळीबारात एकाचा मृत्यू, एक गंभीर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.