Warkari Pickup Accident : धामणगाव जवळ वारकऱ्यांच्या पिकअपचा अपघात, एकाचा मृत्यू, तीन जण गंभीर जखमी

author img

By

Published : Jul 11, 2022, 10:53 PM IST

Warkari Pickup Accident

दर्शन घेऊन परत येत असताना वारकऱ्यांच्या गाडीला ( Warkari Pickup Acciden ) अपघात झाला आहे. बारामती पैठण राज्य महामार्गावर ( Accident on Baramati Paithan State Highway ) धामणगाव जवळील हाकेवाडी फाट्याजवळ ही घटना घडली. पिकअप खडीच्या ढिगार्‍यावर गेल्यामुळे गाडी उलटली त्यात रावण सखाराम गाडे ( Ravana Sakharam Gade ) (वय वर्षे 50) राहणार धनगरवाडी (माणिकदौंडी जि. अहमदनगर) यांचा मृत्यू झाला आहे.

आष्टी - पंढरीच्या विठुरायाचे दर्शन घेऊन परत येत असताना वारकऱ्यांच्या गाडीला ( Warkari Pickup Acciden ) अपघात झाला आहे. बारामती पैठण राज्य महामार्गावर ( Accident on Baramati Paithan State Highway ) धामणगाव जवळील हाकेवाडी फाट्याजवळ ही घटना घडली. पिकअप खडीच्या ढिगार्‍यावर गेल्यामुळे गाडी उलटली त्यात रावण सखाराम गाडे (वय वर्षे 50) राहणार धनगरवाडी (माणिकदौंडी जि. अहमदनगर) यांचा मृत्यू झाला आहे. तर, अन्य तीन वारकरी गंभीर जखमी झाले आहेत. अंभोरा पोलासांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,माणिकदौंडी जवळील धनगरवाडी येथील वारकरी पंढरीच्या विठोबाच्या दर्शनासाठी दोन दिवसापूर्वी गेले होते. रविवारी आषाढी एकादशीचे दर्शन घेऊन गावाकडे पिकअप (क्रमांक एमएच १६ सी.सी.०३८१) ने परत येत असताना हा अपघात झाला.

धामणगाव जवळील हाकेवाडी फाट्यावर घटना - वारकऱ्यांची पिअकप धामणगाव जवळील हाकेवाडी फाट्यावर आली असता रस्त्याच्या रस्त्यावर अज्ञात व्यक्तीने कोणीतरी खडीचा ढिगारा टाकला आहे. याच खडीच्या ढिगार्‍यावर पिअकप जाऊन पलटी झाले. त्यामध्ये रावन गाडे यांचा मृत्यू झाला तर, तीन अन्य वारकरी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहमदनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी एक जण अतिगंभीर असल्याची माहिती समजली आहे. घटनास्थळी अंभोरा पोलीस स्टेशनचे रोहित बेंबरे यांनी घटनास्थळी तात्काळ भेट देत जखमींना उपचारासाठी नेण्यासाठी मदत केली. याप्रकरणी अंभोरा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान, सांगली जि्ल्ह्यातही वारकऱ्यांचा गाडीला अपघात झाला आहे. पंढरपूरहून आषाढीवारी संपून परतत असणाऱ्या वारकऱ्यांच्या गाडीला तासगाव तालुक्यातील मनेराजुरी या ठिकाणी ( Warakari Tempo Accident ) अपघात झाला आहे. शिराळा तालुक्यातील असणाऱ्या दिंडीतील 10 वारकरी ( 10 Warakari injured ) यामध्ये जखमी झाले आहेत. वळण घेत असताना चालकाचा ताबा सुटल्याने टेम्पो पलटी ( Accident due to reversal of tempo ) होऊन हा अपघात घडला आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी सांगली, मिरजच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. पंढरपूर या ठिकाणी आषाढी वारीसाठी सांगली जिल्ह्यातल्या शिराळा तालुक्यातील भागाईवाडी परिसरातील सुमारे 60 वारकरी गेले होते. विठ्ठल दर्शन झाल्यानंतर या वारकऱ्यांची दिंडी गाडीतून आपल्या गावी शिराळा या ठिकाणी परतण्यासाठी सोमवारी सकाळी निघाली होती.

कवठेमंकाळ- तासगाव मार्गे येत असताना मनेराजुरी येथील पवार वस्ती जवळ गाडी पोहोचली असता,एका वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे टेम्पो पलटी झाला. ज्यामध्ये टेम्पोतील असणारे वारकरी हे एकमेकांच्या अंगावर पडले. त्याचबरोबर काही वारकरी गाडीतून बाहेर फेकले गेले. यामध्ये दहा वारकरी जखमी झाले आहेत. तर, इतर वारकरी किरकोळ जखमी झाले. गंभीर जखमी झालेल्या 10 वारकऱ्यांना तातडीने सांगली, मिरज, तासगाव येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. या अपघातामुळे मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. मात्र, सुदैवाने या अपघातामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

हेही वाचा - Hindu God Photo On Tiles : खासगी शाळेत देवांचे फोटो असलेल्या टाइल्स फरशा; हिंदू संघटनांमध्ये नाराजी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.