परळी केंद्रात दोन दिवस पुरेल एवढाच कोळसा शिल्लक

author img

By

Published : Oct 12, 2021, 8:53 PM IST

परळी केंद्रात दोन दिवस पुरेल एवढाच कोळसा शिल्लक

परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील कार्यान्वित तीन संचापैकी दोन संचातून वीजनिर्मिती होत असून सध्या दोन दिवस पुरेल एवढा कोळसा उपलब्ध असल्याचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांनी सांगितले. त्यामुळे वीजनिर्मतीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बीड - परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील कार्यान्वित तीन संचापैकी दोन संचातून वीजनिर्मिती होत असून सध्या दोन दिवस पुरेल एवढा कोळसा उपलब्ध असल्याचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांनी सांगितले. त्यामुळे वीजनिर्मतीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

750 मे.वॅ.वीज निर्मितीची क्षमता असलेल्या परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्रातून सध्या 365 मे.वॅ.म्हणजेच निम्याने वीज निर्मिती होत आहे.सध्या 12 हजार मे.टन कोळशाचा साठा असला तरी दोन दिवसात कोळसा आला नाही तर वीज निर्मिती ठप्प होऊन भारनियमनात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मराठवाड्यावर वीज संकट गडद-
परळीच्या औ.वि.केंद्रातील पाच पैकी केवळ दोन संचातून 365 मे.वॅ.वीज निर्मिती होत आहे. ढगाळ वातावरणामुळे सौरऊर्जा प्रकल्पातून कमी प्रमाणात वीज येत असल्याने वीजेचा तुटवडा जाणवत आहे. परळी औ.वि.केंद्रातील कार्यान्वित तीन संचासाठी दररोज एक हजार मे.टन कोळशाची आवश्यकता असताना केवळ वीस हजार मे.टन कोळसा उपलब्ध असल्याने मराठवाड्यावर वीज संकट अधिक गडद झाले आहे.


3 रुपये 15 पैसे दराने वीज खरेदी
परळी विजनिर्मीती केंद्रातुन तयार होणारी वीज कोळसा सहाशे कि.मी.दुरवरुन येत असल्याने वाहतुक खर्चामुळे महाग पडत आहे. महावितरणकडुन ही 3 रुपये 15 पैसे युनिट या दराने खरेदी केली जाते.

अतिपाऊस व लांब अंतरामुळे कोळशास विलंब-
परळी विजनिर्मीती केंद्रासाठी कोळसा हा चंद्रपूर,नागपूर,तेलंगणा भागातून आणला जातो सध्या या भागात होत असलेला अति पाऊस व सहाशे कि.मी.चे अंतर यामुळे कोळसा येणास विलंब होत आहे.

कोळशाअभावी केंद्र बंद पडणार नाही-
परळी औष्णीक वीज निर्मिती केंद्रात सध्या 15 हजार मे.टन कोळसा असुन आणखी एक वॅगेन येत आहे. यामुळे कोळशा अभावी परळीचे संच बंद पडणार नाहीत. तर महावितरणकडुन सुचना आल्यानंतर तिसऱ्या संचातुनही विजनिर्मीती करण्यात येईल असे मोहन आव्हाड म्हणाले.

हेही वाचा - राज्यावर वीजसंकट : लोडशेडिंग-वीजदर वाढणार नाहीत - नितीन राऊत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.