Beed Illigel Obortion Case : बीडच्या अवैध गर्भपात प्रकरणातील आरोपी नर्सची आत्महत्या केल्याचे उघड

author img

By

Published : Jun 9, 2022, 4:06 PM IST

Beed Illigel Obortion Case

अवैध गर्भपात प्रकरणातील ( Beed Illigel Obortion Case ) आरोपी नर्स सीमा सुरेश लांडगे ( Seema Landge Suicide ) हीने आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. बीडच्या पाली येथील बिंदुसरा धरणात या नर्सचा ( Seema Landge Deathbody Found In Bindusara Dam ) मृतदेह आढळला होता.

बीड - अवैध गर्भपात प्रकरणातील ( Beed Illigel Obortion Case ) आरोपी नर्स सीमा सुरेश लांडगे ( Seema Landge Suicide ) हीने आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. बीडच्या पाली येथील बिंदुसरा धरणात या नर्सचा ( Seema Landge Deathbody Found In Bindusara Dam ) मृतदेह आढळला होता. नर्सची हत्या की आत्महत्या? यावरुन तर्कवितर्क लावले जात होते.

सीमा लांडगे यांच्यावर गुन्हा - बीडमध्ये बक्करवाडी येथील सीता गाडे या महिलेचा अवैध गर्भपात करताना गर्भाशयाला जखम होऊन रक्तस्त्राव वाढल्याने मृत्यू झाला होता. सीता गाडे यांच्या मृत्यूनंतर हे अवैध गर्भपाताचं प्रकरण उजेडात आलं होत. यानंतर मयत महिलेच्या नातेवाईकांसह अवैध गर्भलिंग चाचणी करणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशीअंती मयत महिलेच्या नातेवाईकांच्या जबाबावरुन बीडमधील एका टेक्निशियनच्या मध्यस्थीने मयत नर्स सीमा लांडगे यांच्याकडे गर्भपात केल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार पोलिसांनी लॅब टेक्निशियनलाही अटक करुन चौकशी केली असता मृत्यू झालेल्या नर्स सीमा लांडगे यांच्याकडे महिलेला गर्भपातासाठी नेल्याचे उघड झाले. त्यानुसार पोलिसांनी टेक्निशियनसह नर्स सीमा लांडगे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.

पोलीस घेत होते शोध - आरोपी नर्स सीमा लांडगे यांना अटक करण्यासाठी पोलीस त्यांच्या घरी गेले असता, त्या नव्हत्या म्हणून पोलिसांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बिंदुसरा धरणात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळल्याचे समजले. त्यानुसार पोलीसांनी महिलेची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला असता मयत महिला आरोपी नर्स सीता लांडगे असल्याचे स्पष्ट झाले. मयत महिलेच्या शवविच्छेदन अहवालानंतर नर्सने आत्महत्या केल्याचे समजले आहे.

आरोपींची कोठडी वाढण्याची शक्यता - याप्रकरणी पोलीसांनी एकूण 6 आरोपींना अटक केली होती. त्यातील नर्सने आत्महत्या केली आहे. तर ज्या अंगणवाडी शिक्षिकेच्या घरी गर्भलिंग निदान चाचणी झाली तिला न्यायालयीन कोठडी देण्यात आली असून मयत सीता गाडे यांचा सख्खा भाऊ, सासु, नवरा व लॅब टेक्निशियन अशा पाच आरोपींना 14 जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस कसून तपास करत असून यात आरोपी वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - Presidential Election 2022: राष्ट्रपती पदाची निवडणूक जाहीर! 18 जुलै'ला मतदान तर 21 जुलै'ला मतमोजणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.