Sanjay Raut News: दोन हजाराचे बंडल भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडे असतील- संजय राऊत

author img

By

Published : May 21, 2023, 9:48 AM IST

Updated : May 21, 2023, 12:09 PM IST

Sanjay Raut News

शनिवारी बीडमध्ये ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेची सभा पार पडली. यावेळी संजय राऊत यांनी जोरदार भाषण केले. आपल्या भाषणातून त्यांनी शिंदे-भाजप सरकारवर जोरदार टीका केली. तसेच पंतप्रधान मोदींवर देखील त्यांनी टीका केली.

गुगलने ताबडतोब मोदीचा चेहरा पुढे आणला- संजय राऊत

बीड : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बीडमध्ये महाप्रबोधन यात्रेच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली. पंतप्रधान मोदींनी केलेल्या दोन हजार रूपयाच्या नोटबंदीच्या घोषणेवर त्यांनी टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, दोन हजाराची बंडल असतील तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडे असतील आणि अदानीकडे आहेत. तसेच गुगलवर फेकू शब्द टाकला तर मोदी नाव येते. गुगलने ताबडतोब मोदीचा चेहरा पुढे आणला, असेही संजय राऊत म्हणाले.

महाप्रबोधन यात्रेची सभा : बाळासाहेब ठाकरे एक लाख मोदींना भारी होते. 40 मिंद्यानी मोदींचा फोटो लावून निवडून दाखवावे, असे आवाहन राऊत यांनी केले. मी बीडमधील परळीला गेलो. गोपीनाथ गडावरही गेलो. या दरम्यान वैजनाथाकडे एकच मागणे मागितले की, पुढच्या वेळी मी मुख्यमंत्री पदावर बसलेल्या उद्धव ठाकरेंना इथे घेऊन येईन, असा निर्धार केल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. महाप्रबोधन यात्रेची पुढील सभा मुंबईत होणार असल्याचेही ते म्हणाले.

आनंदाचा शिधा म्हणजे तुम्ही काय भिक देता का? आज गरिबांची चूल पेटेल की नाही हा प्रश्न आहे- संजय राऊत

शिंदे सरकार बेकायदेशीर : ४० आमदारांना तुम्ही ५० कोटींची शिधा देता. आमच्या गोरगरीब जनतेला मात्र १ किलो साखर देता. आनंदाचा शिधा म्हणजे तुम्ही काय भिक देता का? असा सवालदेखील संजय राऊत यांनी या यात्रेत उपस्थित केला. आज गरिबांची चूल पेटेल की नाही हा प्रश्न आहे, असेही ते म्हणाले. सध्याचे सरकार बेकायदेशीर असल्याचे सुप्रीम कोर्टाने सांगितले. उद्धव ठाकरेंनी नैतिकतेच्या मुद्यावर राजीनामा तेव्हा दिला नसता तर ते आजही मुख्यमंत्री असते. शिंदे गटाला जर थोडी लाज वाटत असेल तर नैतिकतेच्या आधारावर त्यांनी राजीनामा द्यावा, असेही संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा :

  1. Maharashtra Politics: साताऱ्यातून निवडणुकीला उभे राहिल्यास शरद पवारांनाही पाडू; शिवेंद्रराजेंच्या कार्यकर्त्यांचे दिपक पवार यांना आव्हान
  2. Bhagat Singh Koshyari Met CM : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-माजी राज्यपाल कोश्यारी यांची भेट; सत्तासंघर्षावर चर्चा?
  3. Raj Thackeray On Trimbakeshwar : 'कोणी मंदिरात आल्याने आपला धर्म बुडेल एवढा तो कमकुवत आहे का?'
Last Updated :May 21, 2023, 12:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.