अज्ञाताने रासायनिक खत टाकल्याने 200 क्विंटल कांदा सडला; औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील प्रकार

author img

By

Published : Sep 20, 2021, 5:26 PM IST

Updated : Sep 20, 2021, 6:30 PM IST

rotten onion

भेंडाळा येथील शेतकरी नितीन गोकुळ परभने यांनी भेंडाळा शिवारात असलेल्या गट क्रमांक ९८मध्ये शेतात बांधलेल्या कांदा चाळीत अज्ञात व्यक्तीने रासायनिक खत टाकले. यामुळेो 200 क्विंटल कांदा सडल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे परभने यांचे जवळपास तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

गंगापूर (औरंगाबाद) - तालुक्यातील भेंडाळा येथील गट क्रमांक ९८मध्ये असलेल्या शेडमध्ये कांदाचाळीत साठून ठेवलेल्या कांदा चाळीत अज्ञात व्यक्तीने रासायनिक खत टाकल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली. कांदा चाळीतील सुमारे २०० क्विंटल कांदा सडल्याने शेतकरी नितीन परभने यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी नितीन परभने यांच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत बोलताना शेतकरी नितीन परभने

कांदा सडल्याने तीन लाख रुपयांचे नुकसान -

भेंडाळा येथील शेतकरी नितीन गोकुळ परभने यांनी भेंडाळा शिवारात असलेल्या गट क्रमांक ९८मध्ये शेतात बांधलेल्या कांदा चाळीत अज्ञात व्यक्तीने रासायनिक खत टाकले. यामुळेो 200 क्विंटल कांदा सडल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे परभने यांचे जवळपास तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. कांदा विक्रीतून नफा मिळण्याच्या आशेने सात ते आठ महिन्यांपासुन साठवून ठेवलेला कांदा खराब झाल्याने परभने यांच्या अपेक्षेवर पाणी फिरले आहे.

हेही वाचा - येवल्यातील शिक्षकाने गावातल्या भिंतीवर रंगवले इंग्रजी शब्द व मराठी अर्थ

Last Updated :Sep 20, 2021, 6:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.