कासिम रझवीचे समर्थक आज महानगरपालिकांवर राज करतात - जितेंद्र आव्हाड

author img

By

Published : Sep 27, 2021, 11:24 AM IST

Updated : Sep 27, 2021, 12:34 PM IST

जितेंद्र आव्हाड

मराठवाडा साहित्य परिषदेच्या,लोकसंवाद फाउंडेशनच्या वतीने औरंगाबादमध्ये ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्या संमेलनाचा रविवार समारोप झाला. यावेळी आव्हाड यांनी समारोपाचे भाषण केले. त्या भाषणावेळी आव्हाड यांनी अप्रत्यक्षपणे एमआयमवर टीका केली.

औरंंगाबाद - कासिम रझवीला पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यावेळी विचारले होते, तुला भारतात रहायचे आहे की पाकिस्तानात जायचे आहे. तेंव्हा त्याने पाकिस्तानात जाण्याचा मार्ग निवडला होता. आज त्यालाच पाठिंबा देणारी काही माणसं मराठवाड्यातील काही नगरपालिका महानगरपालिका आणि नगर परिषदांवर राज करत आहेत, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नाव न घेता एमआयएम पक्षावर केली आहे.

जितेंद्र आव्हाड
जितेंद्र आव्हाड
मराठवाडा साहित्य परिषदेच्या,लोकसंवाद फाउंडेशनच्या वतीने औरंगाबादमध्ये ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्या संमेलनाचा रविवार समारोप झाला. यावेळी आव्हाड यांनी समारोपाचे भाषण केले. त्या भाषणावेळी आव्हाड यांनी अप्रत्यक्षपणे एमआयमवर टीका केली. यावेळी व्यासपीठार मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, उपाध्यक्ष किरण सगर, स्वागताध्यक्ष राजेश करपे, मुख्य कार्यवाहक राम चव्हाण, उपाध्यक्ष फुलचंद सलामपुरे, उपाध्यक्ष चेतना सोनकांबळे, दादा गोरे, कुंडलिक अतकरे, कैलास अंभुरे, गणेश मोहिते, संदीप पाटील, बळीराम धापसे आदींची उपस्थिती होती.आव्हाड पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात साहित्यिकांकडून साहित्य लिहिण्याची संख्या कमी झाली आहे. त्यासोबतच अनेक चळवळी देखील संपल्या आहेत. ८० च्या काळात ज्या जातीने साहित्य लिहिले जायचं ते आज लिहिले जात नाही. व्यवस्थेला चॅलेंज करायचे असेल तर तसेच धारदार लिखाण देखील झाले पाहिजे. मात्र तेवढे लिखाण करण्याचा अधिकार असायला पाहिजे, असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
जितेंद्र आव्हाड
पूर्वीप्रमाणे प्रामाणिकता राहिली नाही- आव्हाडपुढे बोलतांना ते म्हणाले की,माणूस हा पूर्वीप्रमाणे आता प्रामाणिकता राहिली नाही.तो आज इथे तर उद्या कोण कुठे असेल हे सांगता येत नाही. त्यामुळे प्रामाणिक तर राहिली नसल्याचा टोला त्यांनी पक्षांतर करणायांना लगावला.संतांनी वांग्मय आतून जे लिहिलं ते आंबेडकरांनी संविधानातून मांडलं पण आपल्याकडे आपल्या मनातील विचार आजही जात नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.औरंगाबाद ते अजिंठा आणि वेरूळ लोकल सुरू करायला पाठिंबा- आव्हाडमराठवाडा साहित्य संमेलनात मांडण्यात आलेल्या ठराव क्रमांक १० घाटनांदूर ते श्रीगोंदा या रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण झालेले आहे. या सर्वेक्षणाला तातडीने मान्यता देऊन या मार्गाचे काम त्वरित सुरू करावे. तसेच जागतिक वारसा स्थळे असलेल्या अजिंठा, वेरूळला औरंगाबादशी लोकल रेल्वेमार्गाने जोडल्यास पर्यटनाला चालना मिळेल आणि या मार्गावरील गावांचाही त्या दृष्टीने विकास होईल. म्हणून या मार्गाचे सर्वेक्षण त्वरित हाती घ्यावे अशी मागणी हे साहित्य संमेलन भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाकडे करीत आहे.हा ठराव माडण्यात आला होता.या ठरावाला आव्हाड यांनी औरंगाबाद ते अजिंठा आणि वेरूळ अशी लोकल ट्रेन सुरू करा याला माझा पाठिंबा असल्याचे जाहीर केले.

हेही वाचा - 41 वे मराठवाडा साहित्य संमेलन 25-26 सप्टेंबरला औरंगाबादेत

हेही वाचा - मराठवाड्यात साहित्य निर्मितीचा अनुशेष नाही; मसापच्या साहित्य संमेलनात चव्हाण यांचे प्रतिपादन

Last Updated :Sep 27, 2021, 12:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.