Akbaruddin Owaisi Visit to Aurangzeb Grave : आमदार अकबरुद्दीन ओवेसीची औरंगजेबाच्या कबरीला भेट, नवा वाद पेटण्याची शक्यता

Akbaruddin Owaisi Visit to Aurangzeb Grave : आमदार अकबरुद्दीन ओवेसीची औरंगजेबाच्या कबरीला भेट, नवा वाद पेटण्याची शक्यता
हैदराबादच्या धरतीवर गरीब मुलांना शिक्षण मिळावं याकारीता हिमयात बाग परिसरात शाळा सुरु करण्यात येणार असून, शाळेच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी एमआयएमचे अकबरुद्दीन ओवेसी ( MLA Akbaruddin Owaisi ) शहरात दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी खुलताबाद येथील दर्गांना भेट दिली. येथील मस्जिदीत नमाज देखील अदा केली. कबरीवर फुलं वाहून पुढच्या कार्यक्रमाला मार्गस्त झाले. त्यामुळे आता राजकीय वाद निर्माण करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
औरंगाबाद: तेलंगणाचे आमदार आणि एमआयएम नेते अकबरुद्दीन ओवेसी ( MIM leader Akbaruddin Owaisi ) शाळेच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी अकबरुद्दीन ओवेसी शहरात दाखल झाले आहेत. त्यांनी खुलताबाद येथील औरंगजेब यांच्या कबरीला भेट देत फुलं वाहिली. त्यामुळे शिवसेना यावरून एमआयएमवर टिका करत राजकीय वाद निर्माण करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अकबरुद्दीन ओवेसी औरंगाबाद दौऱ्यावर - हैद्राबादच्या धरतीवर गरीब मुलांना शिक्षण मिळावं याकारिता हिमयात बाग परिसरात शाळा सुरु करण्यात येणार असून, शाळेच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी अकबरुद्दीन ओवेसी शहरात दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी खुलताबाद येथील दर्गांला भेट ( Visit to Dargahs at Khultabad ) दिली. येथील मस्जिदीत नमाज देखील अदा केली. त्यानंतर खासदार इम्तियाज जलील ( MP Imtiaz Jalil ), एमआयएम नेते वारीस पठाण आणि स्थानिक नेत्यांसह अकबरुद्दीन ओवेसी औरंगजेबाच्या कबरीवर गेले. कबरीवर फुलं वाहून ( Owesani laid flowers at Aurangzeb's tomb ) पुढच्या कार्यक्रमाला मार्गस्त झाले.
या आधी निर्माण झाला होता वाद - औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचे हाल करून त्यांची हत्या केली होती. त्यामुळे औरंगजेबाबद्दल राजकीय पक्षांनी आपला द्वेष बोलून दाखवला होता. या आधी देखील अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीला फुल वाहिली होती. त्यावेळी शिवसेना आणि भाजपने टिका केली होती. इतकंच नाही तर एमआयएमला औरंगजेबाची औलाद संभोधण्यात आल होते, तर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे ( Shiv Sena leader Chandrakant Khaire ) यांनी रझा काराची औलाद म्हणून हिनवलं होत. आता अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगजेब कबरीला भेट दिल्याने पुन्हा एकदा नवा वाद निर्माण होईल अशी शक्यता नाकारता येत नाही.
हेही वाचा - Aurangabad Labour colony : लेबर कॉलनीतील तीनशेहून अधिक घरांवर बुलडोझर; रहिवासीयांना अश्रू अनावर
