Mothers Funeral : घरात आईच्या अंत्यविधीची तयारी सुरु, तीन वर्षीय चिमुरडाच्या आईच्या शोधात रस्त्यावर टाहो

author img

By

Published : Jan 18, 2023, 10:32 PM IST

Updated : Jan 18, 2023, 10:49 PM IST

mothers funeral

घरात आईच्या अंत्यविधीची तयारी सुरू असताना एक तीन वर्षीय मुलगा आईच्या शोधात रसत्यावर आला होता. आईला शोधत असतांना तो खाली पडून रक्तभंबाळ झाला. पोलिसांनी त्याच्या वडीलांचा शोध घेऊन त्यांच्या वडीलांच्या स्वाधीन केले मात्र, त्यावेळी पोलिसांना धक्कादायक वास्तव समजले.

औरंगाबाद : रस्त्यांवर एक तीन वर्षीय मुलगा आई आई करत जात होता. अचानक तो खाली पडला, त्याच्या डोक्याला मार लागला, रक्त निघू लागलं. तरी देखील तो आपल्या आईला शोधत होता. पोलिसांच्या माध्यमातून त्याच्या वडिलांचा तपास लागला. मात्र एक धक्कादायक वास्तव त्यावेळी समोर आलं, ते म्हणजे काही वेळापूर्वीच त्याच्या आईचं निधन झालं होतं. घरात अंत्यविधीची तयारी सुरू असताना हा चिमुकला आपल्या आईच्या शोधात रस्त्यावर आला होता. हे वास्तव ऐकून पोलिसांच्याही डोळ्याच्या कडा पाणवल्या होत्या.

आईचा झाला मृत्यू - पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदोर येथील रहिवासी असलेले गिरीराज सोनी आपल्या पत्नीच्या उपचारासाठी तीन वर्षीय मुलासह औरंगाबाद येथे राहण्यासाठी आले होते. खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांच्या पत्नीचे निधन झाले. त्यानंतर पत्नीचा अंत्यविधी इंदोर येथे न करता नातेवाईक औरंगाबाद येथेच राहत असल्याने येथेच करण्याचं ठरलं. जवाहर नगर परिसरात त्यांनी नातेवाईकांना त्याबाबत माहिती दिली. घरात दुःखाचे वातावरण होते, पत्नीचे पार्थिव घरी आणल्यानंतर तिच्या अंत्यविधीची तयारी नातेवाईकांनी सुरू केली होती. तोच त्यांचा तीन वर्षीय मुलगा निखिल आपल्या आईच्या शोधात नातेवाईकांचा डोळा चुकून बाहेर पडला.

दोन महिलांनी केले उपचार - तीन वर्षे चिमुकला रस्त्याने आईला शोधत जात होता त्याच्या डोक्याला दुखापत झाली असून त्यातून रक्त निघत होतं. त्याचवेळी तेथून जाणाऱ्या, पुजा जाधव आणि भावना कुमावत या दोन महिलांनी त्याला जवळ घेतले. तो जखमी असल्याने त्याच्यावर जवळील खाजगी रुग्णालयात उपचार केले. मात्र तो काहीच बोलू शकत नसल्याने, अखेर त्यांनी जवाहर नगर पोलिसात सविस्तर माहिती दिली. पोलीस ठाण्यातील महिला पोलिसांनी त्याची काळजी घेतली.

पोलिसांचे डोळे पानावले - त्यानंतर पोलिसांनी तातडीने शहरातील सर्वच पोलीस ठाण्यात याबाबत कल्पना दिली. काही वेळात मुलाचे वडील पोलीस ठाण्यात दाखल झाले. आपला मुलगा सुखरूप असल्याचा पाहून, त्यांना समाधान वाटलं. मात्र मुलाची माहिती सांगताना त्यांनी घरात घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्या चुमकल्या मुलाकडे बघून पोलिसांचे डोळे देखील पानावले. त्याच्या वडिलांच्या ताब्यात त्याला दिल्यावर त्यांना देखील अश्रू अनावर झाले. ज्या आईच्या शोधात तो बाहेर पडला, प्रत्येक ठिकाणी तिला शोधत होता ती या जगात नाही, हे त्याला कसं सांगावं याबाबत पोलिसांसह कुटुंबीयां पुढे मोठं आव्हान आहे.

Last Updated :Jan 18, 2023, 10:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.