हातावरील टॅटूमुळे फुटलं बिंग; अश्लील फोटो व्हायरल करणाऱ्या दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

author img

By

Published : Sep 17, 2021, 7:33 AM IST

Updated : Sep 17, 2021, 7:39 AM IST

पुंडलिकनगर पोलीस ठाणे

महिला स्पा-सलून व्यावसायिकेशी मैत्री करुन तिचे अश्लील फोटो काढत ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवाय पैसे दिले नाही म्हणून तिचे सर्व फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. तेच फोटाे पीडितेच्या नातेवाईकांना देखील व्हाट्सअॅप करुन बदनामी केली. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरुन त्या आरोपीविरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित किशनलाल सिंदयानी व त्याची पत्नी भावना अशी आरोपींची नावे आहेत.

औरंगाबाद - महिला स्पा-सलून व्यावसायिकेशी मैत्री करुन तिचे अश्लील फोटो काढत ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवाय पैसे दिले नाही म्हणून तिचे सर्व फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. तेच फोटाे पीडितेच्या नातेवाईकांना देखील व्हाट्सअॅप करुन बदनामी केली. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरुन त्या आरोपीविरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित किशनलाल सिंदयानी व त्याची पत्नी भावना अशी आरोपींची नावे आहेत.

गारखेड्यात 32 वर्षीय महिला स्पा-सलूनचा व्यवसाय करते. ती मागणीप्रमाणे घरी जाऊन फेशीयलची सेवा द्यायची. तेव्हा रमा किशनलाल सिंदयानी (रा. अर्थव सोसायटी, निशांत पार्क हॉटेलच्या पाठीमागे, बीड बायपास) ही महिला तिच्या ओळखीची झाली. महिन्यातून दोनवेळा फेशीयल करण्यासाठी पीडिता तिच्या घरी जायची. सततच्या जाण्यामुळे रमा सिंदयानी हिचा मुलगा अमित याच्याशी पीडितेची ओळख झाली. तेव्हा अमित पत्नीसोबत राहत नव्हता. त्यामुळे त्याने पीडितेशी मैत्री वाढविली. दीड वर्षे तिच्या संपर्कात राहिला. मोबाइलवरुन बोलणे, फोटो काढणे असे प्रकार सुरु होते. अंदाजे तीन महिन्यापूर्वी अमितने पीडितेशी वाद घातला. पीडितेच्या उजव्या हातावर पतीचे नाव टॅटू काढून गोंदलेले आहे. ते नाव खोडून त्याठिकाणी माझे नाव टाक असे म्हणून अमितने पीडितेशी वाद घातला. त्याला नकार देऊन पीडिता त्याच्यापासून अलिप्त राहू लागली.

पीडितेने अमितला टॅटू काढण्यास नकार दिल्यावर काही दिवसांनी अमितने तिच्याशी संपर्क साधला. मागील दीड वर्षात तुझ्यावर खर्च झालेले एक लाख रुपये दे, असा तगादा त्याने सुरु केला. त्याचदरम्यान, त्याने पीडितेला पूर्वी काढून ठेवलेले अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर पीडितेने हा प्रकार पतीला विश्वासात घेऊन सांगितला. त्यांनी ३३ हजार रुपये अमितचा भाऊ सुमितच्या फोन पेवर पाठविले. त्यावर अमित काही दिवस शांत राहिला. आठ दिवसांपूर्वी अमितने पुन्हा पैशांची मागणी करुन फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. पैसे नसल्याने त्याला नकार कळविल्यावर त्याने लगेचच पीडितेच्या बहिणीच्या व्हाट्सअपवर अश्लील फोटो पाठविले. पुढे हेच फोटो पीडितेची पुतणी, पुतण्या आदींच्या व्हाट्सअपला पाठवून त्याने बदनामी केली. आरोपी अमित सिंदयानी आणि त्याची पत्नी भावना यांनी दोघांनी मिळून पुन्हा पीडितेच्या स्पा-सलूनच्या नावाने असलेल्या फेसबुक पेजवर तिचे अश्लील फोटो टाकले. त्याखाली वेगवेगळ्या कमेंट लिहिल्या. यामुळे पीडितेची कुटुंबीयांमध्ये, व्यवसायात बदनामी झाली. प्रकार वाढतच राहिल्याने अखेर पीडितेने पुंडलिकनगर ठाण्यात अमित आणि त्याची पत्नी भावना यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. अधिक तपास निरीक्षक दिलीप गांगुर्डे करत आहेत.

Last Updated :Sep 17, 2021, 7:39 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.