गंगापूर आगारातील २० बसला कोरोना बचावाचे कवच, 'अँटी मायक्रोबायबल ट्रीटमेंट'चा प्रयोग

author img

By

Published : Sep 21, 2021, 8:02 AM IST

गंगापूर आगारातील २० बसला कोरोना बचावाचे कवच

राज्य परिवहन महामंडळाने 'अँटी मायक्रोबायबल ट्रीटमेंट'चा (सूक्ष्मजीव विरोधी आवरण) प्रयोग सुरू केला आहे. या अंतर्गत गंगापूर आगाराच्या २० बसचे कोटिंग करण्यात आल्या आलेत. कोरनाचा संसर्ग संपर्कातून होत असल्यामुळे त्याचा मोठा फटका राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसला व खाजगी वाहतुकीला बसला आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने विषाणू विरोधक कोटिंग करून बस निर्जंतुकीकरण केल्या आहेत.

औरंगाबाद (गंगापूर) - कोरोनापासून प्रवाशांचा बचाव करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने 'अँटी मायक्रोबायबल ट्रीटमेंट'चा (सूक्ष्मजीव विरोधी आवरण) प्रयोग सुरू केला आहे. या अंतर्गत गंगापूर आगाराच्या २० बसचे कोटिंग करण्यात आल्या आलेत. कोरनाचा संसर्ग संपर्कातून होत असल्यामुळे त्याचा मोठा फटका राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसला व खाजगी वाहतुकीला बसला आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने विषाणू विरोधक कोटिंग करून बस निर्जंतुकीकरण केल्या आहेत. या कोटिंमुळे सर्व प्रकारचे बॅक्टेरिया व्हायरस आणि फंगस नष्ट होतात. त्यामुळे एकदा कोटिंग केलेली बस सुमारे दोन महिने विषाणूमुक्त राहणार असल्याने प्रवाशांना बिनधास्तपणे सुरक्षित प्रवास करता येणार आहे.

माहिती देताना आगार प्रमुख

दर दोन महिन्यांनी गाड्यांचे होणार कोटिंग

कोरोनापासून बचाव होण्यासाठी राज्य परिवहन मंडळाने मायक्रोबायबल ट्रीटमेंटचा प्रयोग सुरू केला आहे या अंतर्गत गंगापूर आगाराच्या ४९ बसेस असून, त्यापैकी २० बसेसचे कोटिंग करण्यात आले आहे. दर दोन महिन्याला या बसेसचे कोटिंग होणार असल्याची माहिती आगारप्रमुखांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली आहे.

कोटींगमुळे कोरोना संसर्ग पासुन होणार बचाव

कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी बसला कोटिंग करण्यात आली आहे. गंगापूर आगाराच्या 20 बसेसला कोटिंग करण्यात आले आहे. एखादा कोरोना बाधित व्यक्तीने बसमध्ये एखाद्या ठिकाणी हात लावला, त्याच ठिकाणी इतर व्यक्तीने हात लावला तर कोरनाचा संसर्ग होण्याची शक्यता असते. परंतु, कोटिंग केलेल्या बसमध्ये बाधित व्यक्तीने स्पर्श केलेल्या जागेवर इतर व्यक्तीने तो स्पर्श केला, तर कोरोचा संसर्ग होणार नाही. एकदा केलेल्या कोटींगचा प्रभाव दोन महिन्यापर्यंत टिकणार आहे. मात्र, तरीदेखील चालक, वाहक, प्रवाशांनी मास्क घालने, सोशल डिस्टंसिंग ठेवणे आवश्यक असल्याचे आगार प्रमुख म्हणाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.