TET Scam Case: टीईटी घोटाळाप्रकरणी शिक्षकांचे वेतन अन् काम सुरू ठेवण्याचे खंडपीठाचे निर्देश

author img

By

Published : Sep 20, 2022, 4:24 PM IST

Etv Bharat

राज्यात गाजत असलेल्या टीईटी म्हणजेच शिक्षक पात्रता चाचणी घोटाळा संबंधी करण्यात आलेल्या कारवाई बाबत खंडपीठाने शिक्षकांना दिलासा दिला आहे. (TET Scam Case) पुढील आदेशापर्यंत सेवा समाप्त करू नये आणि वेतन थांबवू नये असे आदेश देण्यात आले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात राज्य शासनाच्या विरोधात शिक्षकांच्या वतीने ऍड संभाजी टोपे यांनी बाजू मांडली. यासंबंधी न्यायालयाने १४ नोहेंबर रोजी पुढील सुनावणी ठेवली आहे.

औरंगाबाद - टीईटी घोटाळा संबंधी ७८० शिक्षकांवर कारवाई करण्यात आली. मात्र ही कारवाई करत असताना संबंधित शिक्षकांना आपली बाजू मांडण्याचे संधी देण्यात आली नाही. त्यामुळे काही शिक्षकांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे. शिक्षकांच्या म्हणण्यानुसार करण्यात आलेली कारवाई एकतर्फी आहे. अल्पसंख्यांक शिक्षण संस्थांमध्ये टीईटी परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक नाही. त्याचबरोबर आठवीच्या पुढील वर्गांसाठी देखील पात्रता परीक्षेची गरज नसते. (Teacher Eligibility Test) नैसर्गिक न्याय तत्त्वाप्रमाणे कारवाई करण्यात आलेले शिक्षकांना आपली बाजू मांडण्याचा अधिकार असतो. मात्र, तसं न करता राज्य सरकारने कारवाई केलेली आहे. त्यामुळे ऍड संभाजी टोपे यांच्या माध्यमातून शिक्षकांनी खंडपीठात धाव घेतली होती.

माहिती देताना वकिल

आदेशाला स्थगिती - औरंगाबाद खंडपीठात काही शिक्षकांनी धाव घेत शासनाने घेतलेला निर्णय अन्याय कारक असल्याचं सांगितलं. त्यावर न्यायालयाने पुढील निर्णय पर्यंत काम नियमित सुरू ठेवण्याचे आणि वेतन नियमित सुरू ठेवण्याचे निर्देश दिले. या पूर्वी मुंबई उच्च न्यायालय आणि नागपूर खंडपीठात याआधी काही याचिकांमधे न्यायालयाने काम सुरू ठेवण्याचे निर्देश दिले. ( TET scam accused Tukaram Supe ) मात्र औरंगाबाद खंडपीठात वेतन सुरू ठेवण्याचे निर्देश दिल्याने इतर याचिकाकर्त्यांना फायदा होईल अशी माहिती ऍड संभाजी टोपे यांनी दिली.

अपात्र शिक्षकांची यादी जाहीर राज्यातील अनेक जिल्ह्यात टीईटी घोटाळ्यातील शिक्षकांवर कारवाई होत Action against teachers in TET scam असतांना लातूर येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून मात्र अपात्र शिक्षकांची यादी दिली गेली नाही असा आरोप सध्या करण्यात आला आहे. आरोप झाल्यानंतर बुधवारी रात्री उशिरा अपात्र शिक्षकांची यादी जाहीर केली. एवढेच नाही तर शिक्षणाधिकार्यांना अपात्र शिक्षकांची यादी देण्यास मज्जाव करण्यात आला होता.

शिक्षकांचे ऑगस्टपासूनचे वेतन बंद टीईटी घोटाळ्यातील 7 हजार ८७४ शिक्षकांना अपात्र करण्यात आल्यानंतर ऑगस्टपासून वेतन बंद करण्याचे आदेश पुणे येथील शिक्षण संचालकांनी दिले होते. त्यानुसार बहुतांश जिल्ह्यात शिक्षकांचे ऑगस्ट महिण्यापासूनचे वेतन बंद करण्यात आले आहे.

लातूर येथील शिक्षण उपसंचालक लातूर येथील शिक्षण उपसंचालक यांच्याकडे लातूर, नांदेड व उस्मानाबाद जिल्ह्यातील अपात्र शिक्षकांच्या याद्या होत्या. एकीकडे शिक्षण संचालक टीईटी घोटाळ्यातील TET Exam Teacher Recruitment अपात्र शिक्षकांवर कार्यवाही करत सात हजार ८७४ शिक्षकांची यादी प्रसिध्द केली. ही यादी समाज माध्यमावर प्रसारीत झाली. परंतु शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून नांदेड जिल्ह्यातील अपात्र शिक्षकांची यादी दिली जात नसल्याने शिक्षण उपसंचालक कार्यालयासह शिक्षण विभागातील अधिकार्यांवर संशय व्यक्त केला जात होता. अखेर ही यादी लातूर विभागाचे शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे यांनी आपल्या स्वाक्षरीची जाहीर केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.