41 वे मराठवाडा साहित्य संमेलन 25-26 सप्टेंबरला औरंगाबादेत

author img

By

Published : Sep 18, 2021, 11:01 AM IST

Marathwada Sahitya Sammelan

मराठवाडा साहित्य परिषदेचे (मसाप) 41 वे मराठवाडा साहित्य संमेलन 25 व 26 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. औरंगाबाद येथील मसापच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात हे संमेलन होणार आहे. याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. राजेश करपे यांनी दिली.

औरंगाबाद : 41 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते 25 सप्टेंबर रोजी होणार आहे. तर 26 सप्टेंबर रोजी सायंकाळी समारोपाच्या कार्यक्रमाला राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड उपस्थित राहणार आहेत. याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. राजेश करपे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

41 वे मराठवाडा साहित्य संमेलन 25-26 सप्टेंबरला औरंगाबादेत

25, 26 सप्टेंबरला मराठवाडा साहित्य संमेलन

लोकसंवाद फाऊंडेशनतर्फे मराठवाडा साहित्य परिषदेचे 41 वे मराठवाडा साहित्य संमेलन मसापच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात 25 व 26 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाची माहिती देण्यासाठी मसाप आणि लोकसंवाद फाऊंडेशनच्या पदधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेण्यात आली. मसापचे अध्यक्ष तथा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, कार्यवाह डॉ. दादा गोरे, कोषाध्यक्ष कुंडलिक अतकरे, आयोजक समितीचे मुख्य कार्यवाह डॉ. राम चव्हाण, समन्वयक डॉ. रामचंद्र कालुंखे, उपाध्यक्ष डॉ. फुलचंद सलामपुरे यांची उपस्थिती होती.

कार्यक्रम

उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आ. सतीश चव्हाण, मसापच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मधुकर मुळे उपस्थित असणार आहेत. हे संमेलन आयोजित करण्यासाठी अत्यंत कमी कालावधी मिळाला आहे. नियोजनासाठी 25 समित्या बनवण्यात आल्या आहेत. याशिवाय मुख्य आयोजक समितीही कार्यरत आहे. संमेलनात ज्वलंत विषयावर 4 परिसंवाद, दोन कविसंमेलने, एक कथाकथन, मुलाखत, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ग्रंथ प्रदर्शन हे कार्यक्रम आयोजित केल्याचे डॉ. राजेश करपे यांनी सांगितले.

डॉ. राजेश करपे स्वागताध्यक्ष

मुख्य कार्यवाह डॉ. राम चव्हाण यांनी लोकसंवादच्या बैठकीत डॉ. राजेश करपे यांची बहुमताने संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी निवड केल्याचे सांगितले. यावेळी आयोजक समितीचे सहकार्यवाह डॉ. कैलास अंभुरे, डॉ. गणेश मोहिते, डॉ. बळीराम धापसे, स्मरणिका संपादक डॉ. हंसराज जाधव, सदस्य डॉ. रविकिरण सावंत, प्रा. अर्जुन मोरे, प्रा. बंडू सोमवंशी उपस्थित होते. मराठवाडा साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी लोकसंवाद फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. राजेश करपे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच मुख्य कार्यवाह म्हणून डॉ. राम चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. आयोजित समितीमध्ये उपाध्यक्ष डॉ. फुलचंद सलामपुरे, डॉ. चेतना सोनकांबळे, समन्वयक डॉ. रामचंद्र काळुंखे, सहकार्यवाह डॉ. कैलाश अंभुरे, डॉ. गणेश मोहिते, कोषाध्यक्ष प्रा. संदीप पाटील, सहकोषाध्यक्ष डॉ. बळीराम धापसे, स्मरणिका संपादक डॉ. हंसराज जाधव यांच्यासह सदस्यपदी डॉ. रविकिरण सावंत, डॉ. मुंजा धोंडगे, डॉ. फेरोज सय्यद, डॉ. शिल्पा जिवरग, डॉ. सर्जेराव बनसोडे, प्रा. अर्जुन मोरे, सुदाम मुळे पाटील, डॉ. शैलेश आकुलवार, प्रा. बंडु सोमवंशी कार्य करीत आहेत.

कोरोनामुळे ग्रंथ दिंडी रद्द

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाडा साहित्य संमेलनात कोरोना नियमांची अमलबवणी करण्यात येईल, अशी माहिती मसापचे अध्यक्ष ठाले पाटील यांनी दिली. त्यामुळे संमेलनात ग्रंथदिंडी काढली जाणार नाही. तसेच कोविडच्या नियमांचे कोठेही उल्लंघन केले जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. मराठवाडा साहित्य संमेलन 2001 नंतर तब्बल 20 वर्षांनी औरंगाबाद शहरात होत आहे. देगलूरचे संमेलन रद्द झाल्यामुळे तरुण रक्ताच्या युवा प्राध्यापकांना संमेलन आयोजित करण्याची संधी दिली. संमेलनाचे अध्यक्ष साहित्यिक बाबू बिरादर असणार आहेत.

हेही वाचा - मुंबईत घातपाताची तयारी; जानला स्फोटकांची डिलिव्हरी घेण्यास सांगणारा जाकीर एटीएसच्या ताब्यात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.