Robbery case : अंजनगांव दरोडा प्रकरणातीला दोन आरोपी पोलीसांच्या जाळ्यात

Robbery case : अंजनगांव दरोडा प्रकरणातीला दोन आरोपी पोलीसांच्या जाळ्यात
अंजनगांव अकोट रोड वरील खाऱ्या नाल्या जवळील एका व्यवसायिकाच्या गोडाऊन वर रविवारी पहाटे पाच ते सहा अज्ञात लोकांनी व्यापारी व रखवाल्याला मारहाण करून अलमारी मधील चार लाख रुपये लुटूले. या घटनेतील दोन आरोपी पकडण्यास पोलीसांना यश आले. यातील सहा आरोपी फरार असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. (Anjangaon robbery case, Two accused in police custody)
अमरावती : अंजनगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खाऱ्या नाल्याजवळ अब्दुल फारूक अब्दुल रहमान वय ५५ हा बुधवार सुर्जी अंजनगाव येथील रहिवासी असून यांचे बिल्डिंग मटेरियल आणि जुन्या चार चाकी वाहन विक्रीचे गोडाऊन आहे. सदर गोडाऊन वर दि.४ चे मध्यरात्रीनंतर रखवाली व मालक यास मारहाण करून आलमारीतील चार लाख रुपयावर घेऊन दरोडेखोर पसार झाली होते, जाताना दरोडेखोरांनी सीसीटीव्ही कॕमेरासह मोबाईल जाळून रात्रीच मोटर सायकलने पसार झाले होते.
गुन्हेगारच होता पोलिसांच्या संपर्कात : अंजनगांव पोलासासाठी आरोपी पकडणे ही मोठी कसरत असतांना यातील एक आरोपी अतीक नियाज अब्दुल मुनाफ २९ रा. बुधवारा हा स्थानीक गुन्हेशाखेच्या रडावर आला होता. अकोला येथुन आलेल्या ४ व मध्यप्रदेशातून आलेल्या २ आरोपींच्या राहण्याची व्यवस्था आतीकने त्याच्या घरीच केली होती. घटनास्थळी सोडून पाळत ठेवण्याचे कामही आतीकने केले होते. तसेच यातील दुसरा आरोपी उबेद शरिफ (३४ रा. भालदारपुरा अंजनगांव) याने घटनास्थळ दाखवून रेकी करुन मुख्य सुत्रधार आरोपीला माहिती पुरवली होती.
आरोपी पोलीसाच्या जाळ्यात अडकला : फरार असलेल्या सहा आरोपीपैकी मुख्य सुत्रधार अकोला येथील असून आरोपी व आतीक याने गोडावून बाहेर पाळत ठेवली. मुख्य आरोपीने सदर घटना करण्यापूर्वी सर्वांना कामे वाटून दिली होती. काम फत्ते झाल्यानंतर अंजनगांव येथील उबेद याला त्याचा मोबदला घेण्यासाठी अकोला येथे बोलावले. परंतू तो तेथुनही फरार झाल्याने उबेद याला खाली हात परत यावे लागले. पोलिसांना गुप्त माहिती मिळताच उबेद नावाच्या आरोपीला आज दिनांक सात डिसेंबर रोजी तो पोलीसाच्या जाळ्यात अडकला.
स्थानिक गुन्हेगार सतत पोलिसांच्या संपर्कात राहत असतो : सदर गुन्ह्यात मध्यप्रदेश व अकोल्याचे आरोपी असून हे आरोपी सध्या फरार आहेत. पोलीस या दरोडेखोरांच्या मार्गावर पोलीस असुन लवकरच हे आरोपी पोलीसांच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता आहे. अंजनगांव येथील दरोड्याच्य अगोदर अचलपुर येथेही या सहा आरोपींनी घरफोडी करण्याकरिता गेले होते. अशी माहिती पोलीसांनी सांगीतली परंतू तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. यातील उबेद नावाचा स्थानिक गुन्हेगार सतत पोलिसांच्या संपर्कात राहत असतो. काही माहिती पोलिसांना देत होता असे ठाणेदार दीपक वानखडे यांनी पोलीस पत्रकारांना सांगितले.
इतर आरोपींचा शोध सुरू : या प्रकरणात अंजनगांव पोलीस सखोल चौकशी करत असून इतर काही गुन्हे उघडकीस येतात का ? या दृष्टीनेसुद्धा पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणाचा संपूर्ण तपास जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव, उपविभागीय पोलीस अधिकारी सत्येंद्र शिंदे, गुन्हा अन्वेषण विभागाचे अधिकारी तपत कोल्हे व त्यांच्या विभागाचे सर्व कर्मचारी, स्थानिक पोलीस स्टेशनचे ठाणेदार दीपक वानखडे, पो उपनिरीक्षक राठोड तसेच डी.बी स्कॉटचे कर्मचारी हे करत असून सदर गुन्ह्यातील फरार आरोपीचा कसून शोध पोलीस घेत आहेत.
