Electricity Issue : वीज वितरणच्या कार्यालयातच फाशी घेण्याचा प्रयत्न; वीजेच्या प्रश्नावर ठाकरे गट आक्रमक

author img

By

Published : Dec 7, 2022, 7:41 PM IST

Etv Bharat

वीज वितरणच्या कार्यालयातच ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष प्रकाश मारोटकर यांनी फाशी घेण्याचा प्रयत्न ( Shiv Sana Taluka Head Attempted Suicide By Hanging ) केला. वीजेच्या प्रश्नावर ठाकरे गट आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. रब्बी हंगामाच्या ( Rabbi season ) पेरणी होऊन एक महिना झाला. विज पुरवठ्या अभावी पिकाला पाणी नाही. त्यामुळे पिक सुकून चालली आहेत.

अमरावती : शेतकऱ्यांना सिंचनासाठी 24 तास वीज मिळावी या मागणीसाठी ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष प्रकाश मारोटकर यांनी आज विद्युत अभियंतांच्या समोरच वीज वितरणच्या कार्यालयात फाशी घेण्याचा प्रयत्न केला. प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे यांच्या कक्षात ठिय्याकरून शेतकऱ्यांनी गळ्यात फास घालून ( Shiv Sana Taluka Head Attempted Suicide By Hanging ) अनोखे आंदोलन केले. तालुक्यातील रोहित्र बसविणे व इतर समस्या तात्काळ सोडविण्याचे लेखी अश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

कार्यालयातच फाशी घेण्याचा प्रयत्न

सिंचनासाठी वीज नाही : नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील बऱ्याच गावांना सिंचनासाठी वीज मिळत नाही. तेव्हा त्यांना 24 तास वीज उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी अनेकदा शिवसेनेच्या ठाकरे गटाच्यावतीने निवेदने देण्यात आली. परंतू त्यावर मात्र अंमलबजावणी झाली नसल्याचे ठाकरे गडाचे शिवसेना तालुकाध्यक्ष प्रकाश मारोटकर यांनी ( Taluka Head Suicide Attempted In Superintending Office ) सांगितले. पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यांना कृषीपंपाची बारा तास वीज देण्यात येत आहे. मात्र पश्चिम विदर्भाला यात वगळण्यात आले. शेतकऱ्यांच्‍या प्रश्‍नावर उद्धव ठाकरे गटाच्‍या शिवसेनेतर्फे वीज वितरण अभियंताच्या कक्षात आंदोलन केले. या आंदोलनात मुख्‍य अभियंत्‍याच्‍या कक्षातच पंख्‍याला दोरी बांधून एकाने आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न केला.


पेरणी होऊन एक महिन्याचा कालावधी : रब्बी हंगामाच्या ( Rabbi season ) पिकांची पेरणी होऊन एक महिन्याचा कालावधी होत झाला. नांदगाव तालुक्यातील कृषी पंपाचे शेकडो रोहित्र बंद असल्याने शेतकऱ्यांच्या चना व गहू पिकाला पाणी पुरवठा झाला नाही. पिके सुकण्याच्या मार्गावर ( Crops Damage Lack Of Power Supply ) आहेत. मांजरी म्हसला, सातरगाव, आडगाव या भागातील रोहित्र दोन वर्षांपासून बंद आहेत. त्यामुळे शेकऱ्यांचे पीक सुकून लाखो रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी विवंचनेत सापडला आहे. आधीच अतिवृष्टीने खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी कर्ज बाजारी झाला आहे.

विज पुरवठ्या अभावी पिकाला पाणी नाही : शेतात मुबलक पाणी असताना विज पुरवठ्या अभावी पिकाला पाणी मिळत नाही. वेळी अवेळी वीज पुरवठा खंडीत होतो. तसेच सिंगल फेज लाईन अनेक महिन्यापासून मिळत नाही. शेकडो रोहित्र ओहरलोड असतांना वर्षानुवर्षे नवीन रोहित्र बसविण्यात आले नाही. समस्या घेऊन नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनr विज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता खानंदे यांच्या कार्यालयात धडक देऊन अचानक शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांनी गळफास लावला. अधिकाऱ्यांत प्रचंड तारांबळ उडाली होती. शिवसेनेचे संपर्क प्रमुख सुधीर सुर्यवंशी यांनी समजूत काढल्याने अनर्थ टळला गळ्यात फास घालून दोन तास ठिय्या आंदोलन केले. यावेळी लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.


शेकडो शेतकरी उपस्थित : यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख सुधीर सूर्यवंशी माजी जि. प. सदस्य अभिजित ढेपे यांनी आंदोलनात सहभागी होऊन मध्यस्थी केली. यावेळी सरपंच श्रीकृष्ण सोळंके, मनदेव चव्हाण, अक्षय राणे, हेमंत ढेपे, मनोज ढोके, पिंटू तुपट, गुणवन्त चांदूरकर, शुभम सावरकर यांचेसह शेकडो शेतकरी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.