Samruddhi Highway : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केली समृद्धी महामार्गाची पाहणी; जालन्यात दाखवले काळे झेंडे

author img

By

Published : Dec 4, 2022, 5:36 PM IST

Updated : Dec 4, 2022, 9:52 PM IST

Inspect samruddhi Highway

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी समृद्धी महामार्गाची पाहणी केली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः वाहन ( Devendra Fadnavis Inspect samruddhi Highway ) चालविले. अमरावती जिल्ह्यात महामार्गासाठी 2 हजार 850 कोटी खर्च झाले आहेत. जालना येथे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना काळे झेंडे दाखवण्यात आले होते.

नागपूर/शिर्डी/जालना/अमरावती : समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या टप्प्याचे लवकरच लोकार्पण होणार ( Nagpur Shirdi Road samruddhi Highway Inauguration ) असून, त्याअनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महामार्गाची पाहणी केली. नागपूर येथून समृद्धी महामार्गास प्रारंभ होत असून तेथून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी पाहणी दौरा सुरु ( Eknath Shinde Inspect samruddhi Highway ) केला. दरम्यान, जालना येथे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना काळे झेंडे दाखवण्यात आले होते.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे - समृद्धी महामार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांच्या हस्ते 11 डिसेंबरला उद्घाटन होणार आहे. यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( DCM Devendra Fadnavis ) यांनी समृद्धी महामार्गाची पाहणी केली. जालन्यातील जामवाडी येथे पाहणीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांचा ताफा येताच शेतकऱ्यांकडून काळे झेंडे दाखवण्यात ( Farmer Showed Black flags ) आले. यावेळी काळे झेंडे दाखवणार्यांना पोलिसांनी अडवत त्यांच्याकडील काळे झेंडे हिसकावण्यात आले.

उपमुख्यमंत्र्यांच्या हाती स्टेअरिंग

जिल्ह्यात दोन ठिकाणी टोल प्लाझा : अमरावती जिल्ह्यात महामार्गावर आसेगाव आणि शिवणी या दोन ठिकाणी टोल प्लाझा देण्यात आले आहे. नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वे व धामणगाव रेल्वे या तालुक्यातून आणि 46 गावांमधून महामार्ग जात आहे. एकूण लांबी 73 किमी आहे. महामार्गाची रुंदी 120 मीटर असून सदर मार्ग 6 पदरी आहे. अमरावती जिल्ह्यात समृद्धी महामार्गाची लांबी 73 किलोमीटर आहे. या संपूर्ण मार्गात प्रवास करत मार्गाची पाहणी करण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः वाहन ( Devendra Fadnavis Inspect samruddhi Highway ) चालविले.

असा आहे हा मार्ग : मार्गावर 4 मोठे व 64 लहान अशा 68 पुलांचा समावेश आहे. एक रेल्वे उड्डाणपूल आहे. महामार्गावरील वाहतूक विना अडथळा होण्यासाठी 31 व्हेईकल अंडरपास आहेत. लाईट व्हेईकल अंडरपास 9 आहेत. प्राण्यांना संचारासाठी कॅटल अंडरपास 34 आहेत. व्हेईकल ओव्हरपास एक आहे. महामार्गासाठी जिल्ह्यात 1 हजार 73 हेक्टर जमीनीचे अधिग्रहण करण्यात आले आहे. जिल्ह्यात महामार्गासाठी 2 हजार 850 कोटी खर्च झाला आहे.

ताफा जाताना

आमदार आणि अधिकाऱ्यांची उपस्थिती : दौ-याच्या अनुषंगाने धामणगाव नजिकच्या टप्प्यावर जिल्हा प्रशासनातर्फे बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आमदार प्रताप अडसड, उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, उपजिल्हाधिकारी राम लंके, तहसीलदार पुरूषोत्तम भुसारी, वैशाख वाहुरवाघ यांच्यासह पोलीस अधिकारी, समृद्धी महामार्गाचे अधिकारी उपस्थित होते.

Last Updated :Dec 4, 2022, 9:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.