Gram Gita : मुलीच्या लग्नात येणाऱ्या पाहुण्यांना ग्रामगीता भेट, अमरावतीच्या प्राध्यापकाचा आगळावेगळा ध्यास

author img

By

Published : Dec 3, 2022, 4:27 PM IST

Updated : Dec 3, 2022, 7:51 PM IST

Gram Gita

मुंलीच्या लग्नात संत तुकडोजी महाराज ( Rashtrasant Tukdoji Maharaj ) यांची ग्रामगीता देण्याचा निर्णय, अमरावतीतील एका प्राध्यापकाने घेतला आहे. समाजासाठी फायदेशीर असणारी ग्रामगीता ( Gram Gita ) आपल्या लग्नात प्रत्येकाला भेट देण्याच्या वडिलांच्या संकल्पनेचे मुलीने देखील स्वागत केले आहे.

अमरावती - लग्नात येणाऱ्या पाहुण्यांना आपल्या वतीने एखादी भेटवस्तू देण्याची प्रथा आहे. या प्रथेनुसार साडी कपडे किंवा फांडे अशा अशा स्वरूपातील भेटवस्तू देण्याऐवजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ( Rashtrasant Tukdoji Maharaj ) यांनी ग्रामव्यवस्थेसह संपूर्ण राष्ट्र निर्मितीसाठी रचलेला ग्रामगीता ( Gram Gita gift ) हा काव्यग्रंथ येणाऱ्या पाहुण्यांना भेट देण्याचा निर्णय अमरावती शहरातील एका प्राध्यापकाने ( professor from Amravati ) घेतला आहे. समाजासाठी अतिशय फायदेशीर असणारी ग्रामगीता ( Gram Gita ) आपल्या लग्नात प्रत्येकाला भेट देण्याच्या वडिलांच्या संकल्पनेचे मुलीने देखील स्वागत केले आहे.

लग्नात येणाऱ्या पाहुण्यांना ग्रामगीता भेट

अशी आहे संकल्पना - अमरावती शहरालगत असणाऱ्या बोडणा येथील सौ वसुधाताई देशमुख कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. संजय देशमुख यांची मुलगी प्रांजलचे लग्न चार डिसेंबरला नागपूर येथील आदित्य तिवारी यांच्यासोबत येथील रंगोली पर्ल या हॉटेलमध्ये होणार आहे. त्यानिमित लग्नाला परंपरेनुसार येणाऱ्या पाहुण्यांना एक गिफ्ट देत असतो.

गावाकरता देशाकरता फायदा - लग्नानिमित्त येणाऱ्या पाहुण्यांना कोणी साड्या देतो, कोणी भांडी देतात. त्याचा उपयोग होत नाही. कुठेतरी ते अडगळी मध्ये पडून राहत्तं. याबाबत आम्ही विचार करताना असा एक लक्षात आलं की, आपण ज्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो आहे. त्या क्षेत्रातूनच असं काय देता येईल की, ज्यामुळे लोकांचा फायदा होईल. आपल्या शहरा करता गावाकरता देशाकरता फायदा होईल तर ते म्हणजे ग्रामगीता असल्याचे आमच्या लक्षात आल्याचे प्राध्यापक डॉ. संजय देशमुख भारतची बोलताना म्हणाले.

देश आपला स्वच्छ, सुंदर व्हावे - आदरणीय तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेद्वारे जो संदेश दिला आहे तो खरोखरच सगळ्यांनी थोडा थोडा जरी, अमलात आणला तर आपलं देश, आपलं गाव, खरंच अतिशय सुंदर होऊ शकतो. सर्व देश आपला स्वच्छ, सुंदर व्हावा या अपेक्षेतून ग्रामगीता जर सर्वांच्या घरोघर पोहोचणे आज एक काळाची गरज आहे. की त्या माध्यमातून आपला देश स्वच्छ, सुंदर होण्यास मदत होईल असा विश्वास प्राध्यापक डॉ. संजय देशमुख यांनी व्यक्त केला.

ग्रामगीतेच्या अनुकरणातून होऊ शकतो सकारात्मक बदल - माझ्या लग्नामध्ये येणाऱ्या पाहुण्यांना ग्रामगीता वितरित करण्याचा माझ्या वडिलांचा निर्णय अतिशय चांगला असून या निर्णयाचे माझ्यासह कुटुंबातील सर्वांनीच स्वागत केले आहे. वातावरणात होत असणारे बदल आणि निसर्ग संवर्धनासाठी ग्रामगीतेतून जनजागृती होऊ शकते. आमच्या ह्या प्रयत्नातून जे पाहुणे लग्नाला येणार आहे. त्यांना ग्रामगीता मिळाल्यावर त्यांच्यापैकी अनेक जण काही बोध घेतील. या छोट्याशा प्रयत्नातून समाज हिताच्या दृष्टीने काहीसा तरी, फरक पडेल अशी आशा वधू प्रांजल देशमुख हिने 'ईटीव्ही भारत ' शी बोलताना व्यक्त केली.

अशी आहे ग्रामगीता - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी एकूण 4 हजार 675 ओव्यांची ग्रामगीता लिहिली आहे. या ग्रामगीतेचे प्रकाशन 1955 मध्ये झाले असून विनोबा भावे, सोनोपंत दांडेकर, वि. स खांडेकर, संत गाडगेबाबा यांचे प्रास्ताविक या ग्रामगीतेला आहे. साध्या, सोप्या, सरळ, रसाळ मराठी भाषेत तुकडोजी महाराजांनी भगवद्गीतेच्या तत्त्वावर ग्रामगीतेची रचना केली.

ग्रामगीतेवर गांधी विचारांचा पगडा - भारताची ग्राम संस्कृती ग्राम गीतेमध्ये शब्दरूप घेऊन समर्थपणे प्रकट झाली आहे. एकूणच ग्रामीण व्यवस्था कशी असावी. बळकट अशा ग्रामीण व्यवस्थेवरच देशाची प्रगती कशी अवलंबून आहे. याचे संपूर्ण मार्गदर्शन या ग्रामगीतेत आहे. ग्रामगीतेद्वारे आपल्या घरासह परिसराचा गावाचा शहराचा संपूर्ण देशाचे हित साधले जाईल याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. तसेच ग्रामगीतेवर गांधी विचारांचा पगडा असल्याचे प्राध्यापक म्हणाले.

Last Updated :Dec 3, 2022, 7:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.