Dr Babasaheb Ambedkar Ashes : 'या' गावात आहेत डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी, हजारो अनुयायी घेतात दर्शन

author img

By

Published : Dec 6, 2022, 6:48 AM IST

Dr Babasaheb Ambedkar Ashes

आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन (Dr Babasaheb Ambedkar Mahaparinirvana day) आहे. त्यांच्या अस्थी या अमरावती जिल्ह्यात नया अकोला या गावात (Babasaheb Ambedkar ashes located at Naya Akola) आहेत. याबाबतचा रोचक प्रसंग जाणून घेऊ या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थि असणारे ठिकाण आज बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त हार फुलांनी सजवण्यात आले आहे.

अमरावती : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या काही अस्थी या अमरावती जिल्ह्यात नया अकोला या गावात (Dr Babasaheb Ambedkar ashes) आहेत. या ठिकाणी असणाऱ्या ह्या अस्थींच्या दर्शनासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शेकडो अनुयायी त्यांच्या महापरिनिर्वाण दिनाला 9 डिसेंबरला अस्थि स्थापना दिनाच्या पर्वावरदेखील मोठ्या संख्येने येतात.


बाबासाहेबांच्या अस्थी : नया अकोला ह्या छोट्याशा गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थि असणे ही खरंतर आश्चर्याची बाब आहे. 6 डिसेंबर 1956 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईत निधन झाल्यावर त्यांच्या मृतदेहावर दादर येथील चौपाटीलगत अंत्यसंस्कार करण्यात आले होते. असे असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आस्थि इतक्या लांब नया अकोला येथे कशा आल्या याबाबत अतिशय रोचक असा प्रसंग आहे. ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे निधन झाले त्या दिवशी अमरावती शहरात अनेक टांग्यांवर भोंगे लावून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनाची माहिती नागरिकांना देण्यात आली.

अंत्ययात्रेत सहभागी : त्यावेळी अमरावती शहरातील अकॅडमिक हायस्कूल येथे इयत्ता दहावीत शिकणारा पिरकाजी खोब्रागडे या विद्यार्थ्याने शाळेजवळ आलेल्या टांग्यावरील भोंग्यात आवाज ऐकला आणि तो थेट शहरातील सायन्सस्कोर या शाळेत त्यावेळी इयत्ता नववीत शिकणारा धोंडोजी छापामोहन याच्याकडे आला. बाबासाहेब गेलेत त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी होण्यासाठी मुंबईला जाऊ, असे पिरकाची यांनी धोंडोजींना सांगितले. त्यानंतर ते दोघेही बडनेरा रेल्वे स्थानकापर्यंत पायी चालत गेले. त्यावेळी बडनेरा रेल्वे स्थानकावर मुंबईला जाण्यासाठी एक बोगी आधीच उभी राहायची. त्या भोगीत हे दोघेही चढले. तासाभराने नागपूर वरून आलेल्या गाडीला हा डबा जोडण्यात आला आणि ही गाडी थेट मुंबईला निघाली. मधातल्या स्थानकांवर या डब्यात प्रचंड गर्दी झाली. गाडी मुंबईला पोहोचल्यावर पिरकाजी आणि धोंडोजी दोघेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. यानंतर या दोघांनी दादर चौपाटीलगतच रात्री कडाक्याच्या थंडीत मुक्काम केला. पहाटे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुत्र यशवंत आणि इतर नातेवाईक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी घेण्यासाठी आले असताना पिरकाची आणि धोंडोजी हे दोघेही अस्थी सावटणाऱ्यांसोबत सहभागी झालेत. यावेळी दोघांनीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काही अस्थी उचलल्या आणि खिशात ठेवल्या. हे दोघेही 9 डिसेंबरला अमरावतीत (Dr Babasaheb Ambedkar Mahaparinirvana day) पोहोचले.

अमरावती जिल्ह्यात नया अकोला या गावात आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी

अनुयायी अस्थींच्या दर्शनासाठी : पिरकाजी आपल्या शाळेतील वस्तीगृहात न जाता थेट आपल्या नया अकोला ह्या गावी गेले आणि त्यांनी आईला सोबत आणलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी दाखवल्या. त्यांच्या आईने बाबासाहेब केवळ आपलेच नव्हते तर गावातील प्रत्येकाचे होते, असे म्हणत या अस्थी गावातील चौकात ठेवायला सांगितल्या. गावातील ग्रामस्थांनी याबाबत एक बैठक घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या अस्थी मोठ्या आदराने जमिनीत एका ठिकाणी पुरवल्या आणि त्यावर छोटासा ओटा बांधून त्यांचे जतन करून ठेवले. तेव्हापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी असणाऱ्या नया अकोला या गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनेक अनुयायी अस्थींच्या दर्शनासाठी येतात. ही संपूर्ण कहाणी सध्या हयात नसणारे पिरकाची खोब्रागडे यांच्या पत्नी शांताबाई खोब्रागडे यांनी 'ईटीव्ही भारत ' शी बोलताना सांगितली. पिरकाची खोब्रागडे यांच्यासोबत लहानपणी मुंबईला गेलेले धोंडोजी छापामोहन यांनी मुंबईला जाण्याचा प्रसंग सांगत माझ्या खिशात आणलेल्या अस्थी मी पिरकाजी खोब्रागडे यांना त्यावेळी दिल्या होत्या. त्या अस्थी आज देखील नया अकोला ह्या गावात आहेत असे धोंडोजी छापामोहन 'ईटीव्ही भारत'शी बोलताना (Babasaheb Ambedkar ashes located at Naya Akola) म्हणाले.

सैन्यात दाखल : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी दादर चौपाटीवरून अमरावतीच्या नया अकोला ह्या गावात आणणारे पिरकाजी खोब्रागडे आणि धोंडोजी छापामोहन हे दोघेही पुढे सैन्यात दाखल झाले. मी मॅट्रिकनंतर सेन्यात दाखल झालो. पिरकाजी खोब्रागडे देखील सैन्यात दाखल झाले. आम्ही दोघेही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अंत्ययात्रेत सहभागी झालो होतो, याची संपूर्ण आठवण मला आज देखील आहे असे धोंडोजी छापामोहन म्हणाले. लग्न झाल्यावर मी माझ्या पत्नीला देखील चैत्यभूमीवर नेले असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुत्र यशवंत आंबेडकर यांनी आमची विचारपूस केली होती, असे देखील धोंडोजी छापामोहन म्हणाले.



अस्थींचे दर्शन : अमरावती शहरापासून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या नया अकोला ह्या गावात जतन करून ठेवण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थीच्या दर्शनासाठी 6 डिसेंबरला अनेक अनुयायांची गर्दी होते. ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थि पुरविण्यात आल्या त्या ठिकाणी आज भव्य सभा मंडप उभारण्यात आले आहे. 9 डिसेंबरला नया अकोला या गावात अस्थिस्थापना दिन देखील साजरा केला (Dr Babasaheb Ambedkar) जातो.


तीर्थक्षेत्र घोषित : 2003- O4 मध्ये काही भंते नया अकोला ह्या गावात आले असताना त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थि विषयी माहिती मिळाली होती. त्यांनी या असती आपल्याकडे सोपवाव्या अशी विनंती गावकऱ्यांना केली होती. मात्र ग्रामस्थांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी देण्यास नकार दिला होता. डॉक्टर सुनील देशमुख हे अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री असताना तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य रामेश्वर अभ्यंकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी असणारे नया अकोला हे गाव क वर्ग तीर्थक्षेत्र घोषित व्हावे, असा प्रस्ताव जिल्हा नियोजन सभेच्या बैठकीत मांडला होता. त्यावेळी जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर सुनील देशमुख यांनी हा प्रस्ताव पारित केल्यावर नया अकोला गावाला क वर्ग तीर्थक्षेत्र घोषित करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष असताना उषा उताणे यांनी दहा लाख रुपये निधी देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी असणाऱ्या ठिकाणी भव्य सभागृह बांधून दिले होते. आज या सभागृहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थींसह भगवान गौतम बुद्धांच्या भव्य मूर्ती तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थि नया अकोला गावात आणणारे पिरकाजी खोब्रागडे यांचे छायाचित्र लावण्यात आले आहे.

सजवले अस्थिस्थळ : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थि असणारे ठिकाण आज बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त हार फुलांनी सजवण्यात आले आहे. बाबासाहेबांचे शेकडो अनुयायी आज दिवसभर या अस्थिस्थळाचे दर्शन घेणार आहेत. जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात अमरावती शहरातून नया अकोला या गावापर्यंत भव्य मिरवणूक निघणार असून यशोमती ठाकूर यांच्यासह मिरवणुकीत सहभागी शेकडोझन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थि स्थळाचे दर्शन घेणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.