Madhukar Abhyankar : सत्ताधाऱ्यांकडून केंद्रीय यंत्रणेचा होतोय गैरवापर- दलितमित्र पुरस्कार प्राप्त मधुकर अभ्यंकर यांची खंत

author img

By

Published : Dec 5, 2022, 12:55 PM IST

Madhukar Abhyankar

आंबेडकरी विचारवंत मधुकर अभ्यंकर (Dalitmitra Award recipient Madhukar Abhyankar) यांनी संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करत सत्ताधाऱ्यांकडून केंद्रीय यंत्रणेचा होतोय गैरवापर अशी खंत व्यक्त केली. संविधानाच्या मूल्यांची गळचेपी होत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच न्यायव्यवस्था डळमळीत होत असून गरिब व मागासवर्गीयांना न्याय मिळत नसल्याचेही त्यांनी (Madhukar Abhyankar regrets central system misused) सांगितले.

अमरावती : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात सांगितलेली समता आज समाजात आढळत नाही. स्वातंत्र्य फक्त नावापुरतेच आहे. या देशाक्या विभिन्न संस्थांमधून विषमता दिसते आहे. आजही मागासवर्गीय लोकांना न्याय मिळत नसल्याची खंत दलित मित्र पुरस्कार प्राप्त आणि आंबेडकरी विचारवंत मधुकर अभ्यंकर यांनी व्यक्त केली (central system misused by rulling party) आहे.

प्रतिक्रिया देताना दलितमित्र पुरस्कार प्राप्त मधुकर अभ्यंकर

न्याय देण्याचा प्रयत्न : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान देऊन आज 72 वर्ष पूर्ण झालीत. संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करत असतानाच मात्र स्वातंत्र्य, समता बंधुत्वाची मूल्य सत्ताधाऱ्यांकडून पायदळी तुडवली जात असल्याची खंत त्यांनी (Dalitmitra Award recipient Madhukar Abhyankar) ईटीव्हीसोबत बोलताना व्यक्त केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जाती धर्मांचा पंथांचा विचार करून संविधान लिहिले. प्रामुख्याने मागासवर्गीय, आदिवासी त्यांना आपल्या संविधानातून न्याय देण्याचा प्रयत्न केला. परंतु संविधानाचे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या मूलतत्त्वाची गळचेपी होतानाच अलीकडे दिसत असल्याचे त्यांनी (Ambedkari thinker Madhukar Abhyankar) सांगितले.

न्यायव्यवस्था डळमळीत : आज समाजामध्ये कुठल्याच घटकात समता आढळत नाही. तर स्वतंत्र हे नावापुरतेच आहे, तर देशाच्या विविध संस्थांमधून समतेऐवजी विषमता पेरण्याचे काम होत असल्याचे त्यांनी सांगितले. देशात नियंत्रण करणाऱ्या केंद्रीय संस्थांवर सत्ताधाऱ्यांनी प्रभुत्व काबीज केले आहे. न्यायव्यवस्था डळमळीत झाली असून त्यांच्याकडून गरीब आणि मागासवर्गीय यांना न्याय मिळत नाही. हे मी नाही, तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश शरद बोबडे न्यायाधीश दीपक मिश्रा यांनी सुद्धा हे मान्य केल्याचे त्यांनी (Madhukar Abhyankar regrets central system misused) सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.