Melghat Homestays : मेळघाटात बदलायला लागले होमस्टेचे स्वरूप ; आदिवासी बांधव आणि पर्यटक दोघेही खुश

author img

By

Published : Dec 9, 2022, 12:38 PM IST

Melghat Homestays

डिसेंबर महिन्यात पर्यटकांची तुफान गर्दी मेळघाटात उसळते. मेळघाटात पर्यटकांसाठी होम स्टेची सुविधा उपलब्ध होत (changing nature of homestays) आहे. त्यामुळे आदिवासी लोकांना आर्थिक उत्पन्नाचेही स्त्रोत उत्पन्न होत (nature of homestays in Melghat) आहे. शासनाच्या वतीने आदिवासी बांधवांना होम स्टे साठी दीड ते दोन लाख रुपये अनुदान दिले होते.

अमरावती : सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या मेळघाटात पर्यटकांना (Melghat Tourists) आता ह्या भागात असणाऱ्या होमस्टेचे स्वरूप पालटायला लागले आहे. अतिशय घनदाट जंगलात होम स्टे उपलब्ध होत असल्यामुळे जंगल प्रेमी पर्यटक खुश होत आहे. तसेच या भागातील आदिवासी बांधवांची देखील आर्थिक भरभराट होते आहे.


मेळघाटात बदलायला लागले होमस्टेचे स्वरूप

होम स्टे आणि वास्तविकता : मेळघाटात चिखलदरा सेमाडोह कोलकास या तीन ठिकाणी पर्यटक दरवर्षी मोठ्या संख्येत भेट देतात. या भागात वनविभागाच्या विश्रामगृहासह पर्यटकांसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने विश्रामगृहाची व्यवस्था करून देण्यात आली आहे. चिखलदरा आणि कोलकास या ठिकाणी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सुविधा उपलब्ध असल्या तरी इतर ठिकाणी मात्र पर्यटकांना कुठे राहावे ? हा मोठा प्रश्न निर्माण होतो. चिखलदरा येथे खाजगी हॉटेल मोठ्या संख्येत असले तरी इतर भागात मात्र पर्यटकांना मुक्काम करण्याची मोठी पंचायत होते. यावर पर्याय म्हणून वनविभागाच्या वतीने सेमाडोह आणि हरिसाल या ठिकाणी आदिवासी बांधवांच्या घरातच पर्यटकांना राहण्याची सोय उपलब्ध व्हावी, यासाठी स्टे होम ही संकल्पना राबविण्यात आली. यासाठी आदिवासी बांधवांना दोन लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले (homestays in Melghat) होते.

पर्यटकांची तुफान गर्दी : मेळघाटात जाणाऱ्या पर्यटकांना शासकीय निवासाची व्यवस्था करण्यासाठी ऑनलाइन बुकिंग करावे लागते, किंवा अमरावती येथील व्याघ्र प्रकल्प कार्यालयातून ही व्यवस्था करण्याची सुविधा आहे. श्रावण महिना यासह डिसेंबर महिन्यात पर्यटकांची तुफान गर्दी मेळघाटात उसळते. अशावेळी या पर्यटकांना होम स्टे करण्याची सुविधा उपलब्ध आहे. शासनाच्या एक ते दीड लाख रुपये अनुदानातून आदिवासी बांधवांनी आपल्या घरी होम स्टे सुविधा पर्यटकांना उपलब्ध करून दिली. मात्र आदिवासी बांधवांच्या घरी अशी तात्पुरती व्यवस्था असली, तरी त्यांना पर्यटकांच्या सुविधांबाबत योग्य असे मार्गदर्शन करण्यात आले नसल्याने पर्यटक केवळ एक रात्र काढायची, अशी गरज म्हणूनच होमस्टेचा आधार घेताना दिसतात. वास्तवात होमस्टेचा आनंद पर्यटकांना घेता यावा, अशी संकल्पनाच या भागात यशस्वी होऊ शकली नसल्याने होम स्टेही संकल्पना केवळ सेमाडोह ह्या गावातच कशीबशी उपलब्ध (nature of homestays in Melghat) आहे.

आदिवासी बांधवांसाठी आदर्श : शासनाच्या वतीने आदिवासी बांधवांना होम स्टे साठी दीड ते दोन लाख रुपये अनुदान दिले होते. या अनुदानातून आदिवासी बांधव एक किंवा दोन खोल्यांमध्ये पर्यटकांसाठी राहण्याची व्यवस्था करायचे. चिखलदरापासून 15 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या खटकाली या गावात आंब्याच्या वनांमध्ये असणाऱ्या प्रकाश जांभेकर यांच्या शेतात देखील अशा स्वरूपाची व्यवस्था होती. जंगलात नेहमीच भेट देणारे जंगल प्रेमी माणिक धोटे यांनी या होमस्टेचा लुक बदलला तर, पर्यटक आनंदाने या ठिकाणी राहतील आणि जांभेकर यांच्या उत्पन्नात भरीव वाढ होऊ शकेल असे लक्षात आले. यानंतर माणिक धोटे यांनी योग्य मार्गदर्शन केल्यावर प्रकाश जांभेकर यांनी देखील आपल्या होमस्टेचा लूक बदलण्याचा मानस (Melghat Tourists becomes happy ) केला.

पर्यटकांसाठी खास व्यवस्था : एखाद्या श्रीमंत शेतकऱ्याच्या फार्म हाऊसला लाजवेल, अशी पर्यटकांसाठी खास व्यवस्था खटकालीच्या जंगलात उपलब्ध झाली. या ठिकाणी दोन मोठ्या खोल्या उभारून त्यामध्ये स्वतंत्र शौचालय आणि चार जण आरामात झोपू शकतील, अशा पलंगाची व्यवस्था करण्यात आली. चारपेक्षा अधिक जण एकाच रूममध्ये राहणार असतील तर त्यांना अतिरिक्त गाद्यांची व्यवस्था देखील येथे उपलब्ध करून देण्यात आली. एका रूममध्ये आठ जण सहज झोपू शकतील, अशी प्रशस्त व्यवस्था या ठिकाणी आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी स्वतंत्र अशी स्वयंपाक खोली बांधण्यात आली असून पर्यटकांना खास मेळघाट स्टाईल जेवण या ठिकाणी उपलब्ध करून दिले (Melghat Homestays) जाते.


मचाणाची व्यवस्था : खटकाली येथील या होमस्टेच्या ठिकाणी पर्यटकांना वनभोजनाचा आनंद घेता यावा, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी उंच असे मचान उभारण्यात आले असून या मचानावर देखील पर्यटन जेवणाचा आस्वाद घेऊ शकतात. मचानावर देखील रात्री मुक्कामाचा आनंद पर्यटकांना येथे घेता येतो. प्रकाश जांभेकर यांचे हे शेत पहाडावर थोडेसे उंच असून काहीसा भाग हा उतारावर असल्याने होमस्टेची व्यवस्था असणारा ठिकाणापासून काही अंतरावरच खोल दरी आणि जंगल पाहायला मिळते. या ठिकाणी सुंदर असे उद्यान आणि पाळण्याची व्यवस्था करण्यात आली (Melghat Homestays) आहे.


टेन्टही उपलब्ध : प्रकाश होमस्टे या नावाने प्रकाश जांभेकर यांचे होम स्टे चिखलदरा परिसरात सर्वांच्या परिचित झाले असून या ठिकाणी पर्यटकांना टेन्टमध्ये रात्र काढण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. टेन्टमध्ये राहून या परिसरात रात्री फिरणारे श्वापद देखील पर्यटकांना पाहता येऊ शकतात. मचानावरून देखील पर्यटकांना वन्यप्राणी पाहता येतात.


पर्यटकांना सुविधा : ख्रिसमस पासून एक जानेवारीपर्यंत चिखलदरा येथे पर्यटकांची प्रचंड गर्दी उसळते. यासह 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि होळीला पर्यटकांची मोठी संख्या चिखलदरा येथे असते. या दिवसांमध्ये चिखलदरा येथील जवळपास सर्वच हॉटेलला हाउसफुलचे बोर्ड लागतात. शासकीय विश्रामगृहसुद्धा पर्यटकांनी भरली असतात. अशावेळी खटकाली येथील होम स्टे मध्ये राहण्याची व्यवस्था होत असल्यामुळे अनेक पर्यटकांना मोठा दिलासा मिळतो. खटकाली येथे ज्या प्रकारे प्रकाश जांभेकर यांनी होम स्टेचा कायापालट केला, असाच प्रयत्न चिखलदरा आणि लगतच्या गावांसह सेमाडोह आणि हरिसाल या भागातील आदिवासी व बांधवांनी केला तर पर्यटकांना मनमुराद आनंद लुटता येईल अशी सुविधा उपलब्ध होईल आणि आदिवासी बांधवांची देखील आर्थिक भरभराट होईल असे माणिक धोटे ई'टीव्ही भारत 'शी बोलताना म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.