Rajendra Gavai : बबलू देशमुखांचे वक्तव्य म्हणजे आंबेडकरी जनतेचा अपमान - डॉ. राजेंद्र गवई

Rajendra Gavai : बबलू देशमुखांचे वक्तव्य म्हणजे आंबेडकरी जनतेचा अपमान - डॉ. राजेंद्र गवई
अमरावती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ( Amravati Congress District President ) अनिरुद्ध उर्फ बबलू देशमुख यांच्या वक्तव्याचा ( Controversial statement of Bablu Deshmukh ) संताप आंबेडकरी जनतेतून व्यक्त होतो आहे. जाहीर सभेत बोलताना देशमुख म्हणाले होते की, 'आम्हाला असा खासदार हवा आहे जो आम्ही काॅलर पकडून आणु शकतो' त्यावर रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजेंद्र गवई ( National General Secretary of Republican Party Dr. Rajendra Gavai ) यांनी टीका केली आहे.
अमरावती - काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा रिपब्लिकन पक्षाने चांगलाच समाचार घेतला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी काँग्रेसच्या जाहिर सभेत बोलतांना देशमुख यांनी बळवंत वानखडे हे आपले भावी खासदार आहेत. आपल्याला असा खासदार पाहिजे की ज्याला आपण कॉलर पकडून आणू शकतो असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
आंबेडकरी जनतेने तुम्हाला का मोठे करावे ? - या वादग्रस्त विधानावरून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांकडून आता टीकेची झोड उठत आहे. आंबेडकरी जनतेने तुम्हाला का मोठे करावे ? तुमच्या पक्षाचे चिन्ह का मोठे करावे? डॉ. राजेंद्र गवई यांनी उपस्थित केला आहे. तुमच्या चिन्हाचा उमेदवार आम्ही का मोठा करायचा? मित्र पक्षाचे निवडणुक चिन्ह संपवायचे अशी काँग्रेसची नीती आहे. त्यांना कॉलर पकडून आणता आला पाहिजे असा खासदार पाहिजे आहे. मात्र हे आंबेडकरी जनता खपवून घेणार नाही, अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजेंद्र गवई यांनी दिली ( National General Secretary of Republican Party Dr. Rajendra Gavai ) आहे.
लोकसभा उमेदवारीवरुन टीका - डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी काँग्रेसने अमरावती ते नया अकोला अशी पदयात्रा काढली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी नया अकोला या गावात असून अभिवादन करण्यासाठी काँग्रेसने ही पदयात्रा काढली होती. ही पदयात्रा नया अकोला येथे पोहोचल्या नंतर त्या ठिकाणी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. लोकसभा , विधानसभा निवडणुकीकरिता अनुसूचित जाती- जमातीचे उमेदवार देताना राष्ट्रीय पक्ष हे अशाच उमेदवाराला उमेदवारी देतात ते बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांपेक्षा त्या पक्षाचे धोरण अधिक चालवतात, अशी टीकाही डॉ. गवई यांनी केली.
