Dogs Virus Infected Amravati : श्वानप्रेमींची चिंता वाढली; 'या' संसर्गजन्य आजाराने ५०% श्वान बाधित

author img

By

Published : Dec 15, 2021, 5:25 PM IST

Updated : Dec 15, 2021, 5:40 PM IST

श्वानांना आजाराची लागण

आता हजारो श्वानप्रेमींची ( Dog Lovers ) चिंता वाढली आहे. एकट्या अमरावती शहरामध्ये तबल ५० टक्के श्वानांवर कैनाइन पार्वोवायरस ( Canine Parvovirus ) या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने श्वान मोठ्या संख्येने आजारी पडत आहे. मागील पंधरा दिवसांपासून शहरातील श्वानावर या आजाराचा प्रादुर्भाव ( Dogs Get Infected ) झाल्याने हजारो श्वान आजारी पडले. मात्र वेळेवर योग्य उपचार झाल्याने आजारातून बरे देखील झाले आहे.

अमरावती - देशभरासह राज्यात ओमायक्रॉन विषाणूने ( Omicron Variant ) अनेकांची चिंता वाढवली असतानाच अमरावतीमध्ये आता हजारो श्वानप्रेमींची ( Dog Lovers ) चिंता वाढली आहे. एकट्या अमरावती शहरामध्ये तबल ५० टक्के श्वानांवर कैनाइन पार्वोवायरस ( Canine Parvovirus ) या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने श्वान मोठ्या संख्येने आजारी पडत आहे. मागील पंधरा दिवसांपासून शहरातील श्वानावर या आजाराचा प्रादुर्भाव ( Dogs Get Infected ) झाल्याने हजारो श्वान आजारी पडले. मात्र वेळेवर योग्य उपचार झाल्याने आजारातून बरे देखील झाले आहे. त्यामुळे वेळेवर उपचार करण्याचे आवाहन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी ( Veterinary Officer ) केले आहे.

श्वानप्रेमी आणि डॉक्टरांनी दिलेल्या प्रतिक्रिया
  • काय आहे कैनाइन पार्वोवायरस ?

कैनाइन पार्वोवायरस या संसर्गजन्य आजारामुळे श्वानाचा तडफडुन मृत्यू होतो. हा व्हायरल पावसाळ्यापूर्वी येत असतो. यंदा मात्र तो पावसाळ्या नंतरही आला आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा या व्हायरसचा संसर्ग देखील मोठ्या प्रमाणावर आहे. या आजारात ९० टक्के श्वानाचा मृत्यू होतो. पण वेळेवर उपचार झाल्यास मृत्यू टाळता येतो. हा आजार अत्यंत संसर्गजन्य आहे. हा व्हायरस श्वानाच्या जठर, आतडे व हृदयाला इजा पोहचवतो.

  • 'ही' आहेत या आजाराची लक्षणे

या आजारा दरम्यान श्वानाला रक्तरंजित अतिसार व दुर्गंधी असलेली विष्ठा होणे. वारंवार उलट्या होणे, ताप येणे, श्वानाला भूक न लागणे, मोठ्या प्रमाणावर त्याला अशक्तपणा व मळमळ होणे. त्याला डिप्रेशनमध्ये गेल्यासारखे वाटणे. तसेच सुस्तपणा आदी लक्षणे या व्हायरसची आहेत, असे पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहेत.

  • या व्हायरसचा मानवाला काही धोका आहे का..?

श्वानांवर आलेल्या या कैनाइन पार्वोवायरस या संसर्गजन्य आजारामुळे श्वानप्रेमींमध्ये भीती पसरली आहे. श्वानाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला हा आजार होतो, असा संभ्रम अनेकांमध्ये आहे. यावर पशुसंवर्धन विभागाने स्पष्टीकरण दिले आहे. श्वान हे सिपीसी रबी स्ट्रेननी संक्रमित होतात. जी झूनोटिक नसते, माणसांची स्ट्रेन बी-१९ आहे. त्यामुळे दोघांमध्ये काहीही संबंध नाही. त्यामुळे या संसर्गजन्य आजाराचा मानवाला काहीही धोका नसल्याचे पशुधन विकास अधिकारी डॉ. सागर ठोसर यांनी सांगितले आहे. कैनाइन पार्वोवायरस या संसर्गजन्य आजाराची लागण झालेल्या श्वानाच्या संपर्कात आलेले नवीन श्वान तसेच बाधित असलेल्या श्वानांच्या मलाच्या संपर्कात दुसरा श्वान येतो. ज्या ठिकाणी बाधित श्वान बसतो. त्या ठिकाणी दुसरा श्वान बसतो. त्या जागेला तो चाटतो आणि मग तेथूनच त्याला या आजाराची लागण होते.

हेही वाचा - Rains Affected Ginger In Yeola : पावसाचे पाणी साचल्याने पिकाची नासाडी, चार एकर अद्रक शेतीवर फिरवला नांगर

Last Updated :Dec 15, 2021, 5:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.