अकोला: पोळ्याच्या दिवशी बैल धुण्यासाठी गेलेल्या तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू

author img

By

Published : Sep 6, 2021, 4:37 PM IST

Updated : Sep 6, 2021, 5:25 PM IST

्

बैल पोळ्यानिमित्त बैल धुण्यासाठी गेलेल्या तिघांचा दोन विविध घटनेत पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. पहिली घटना अकोला तालुक्यातील आगर येथे घडली असून येथील एका युवकाचा मृत्यू झाला आहे. दुसरी घटना ही बार्शीटाकळी तालुक्यातील कानशिवणी येथील काटेपुर्णा व पिंजर्डा नदीच्या संगमावर घडली असून यात दोघे वाहून गेले आहेत.

अकोला - बैल पोळा सणानिमित्त बैल धुण्यासाठी नदीत गेलेल्या आगर येथील युवकाचा गाव तलावात पडून बुडाल्याने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. 6 सप्टेंबर) दुपारी घडली. तर काटेपूर्णा नदीमध्येही दोन जण बैल धुण्यासाठी गेले असता तेही नदीत वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, आगर येथील मनोज खाडे हा युवक गाव तलावात बुडाल्यानंतर त्याला नागरिकांनी बाहेर काढले. मात्र, नदीत वाहून गेलेल्या इतर दोघांचा शोध अजूनही सुरू आहे. सागर गोपाळ कावरे आणि गोपाल महादेब कांबे, असे नदीत वाहून गेलेल्या दोघांची नावे आहेत. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

बैल धुण्यासाठी गेलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांत तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू

सर्वत्र पोळा उत्सव साजरा होत असताना या दिवशी बैलांची पूजा करण्याची प्रथा आहे. बैल धुण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिक हे जवळच्या नदीवर जातात. नदीवर बैलांना धुतल्यानंतर ते घरी आणून त्याची पूजा करत असतात. मात्र, बराच वेळा नदीला पाणी जास्त असल्याने अनेक युवक किंवा नागरिक हे नदीच्या पात्रामध्ये वाहून जात असल्याने त्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत.

अकोला तालुका आणि बार्शीटाकळी तालुक्यातील, असे तीन जण नदीत वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. आगर येथील मनोज खाडे हा बैल धुण्यासाठी गाव तलावात गेला असता त्याचा पाय घसरून तो तलावात बुड्याल्याची घडना घडली. ग्रामस्थांच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी त्याला बाहेर काढले.

बार्शीटाकळी तालुक्यातील कानशिवणी येथील दोन युवक पार्डी येथील काटेपुर्णा व पिंजर्डा नदीच्या संगमावर बैल धुत असताना काटेपुर्णा नदीत वाहून गेले. सागर गोपाळ कावरे आणि गोपाल महादेब कांबेस, असे दोघांची नावे आहेत. पिंजर पोलीस ठाण्याअंतर्गत ही घटना घडली आहे. या दोघांचा शोध घेण्यात येत आहे. या घटनेमुळे दोन्ही गावावर शोककळा पसरली आहे.

हेही वाचा - चिमुकली एचआयव्ही पॉझिटिव्ह प्रकरण; बी.पी. ठाकरे ब्लड बॅंक सील

Last Updated :Sep 6, 2021, 5:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.