Akola Crime : मुलीला सासरी पाठवले नाही म्हणून जावयाने केला सासऱ्याचा खून, आरोपी अटकेत

author img

By

Published : Apr 24, 2022, 5:39 PM IST

मृत

पत्नीला सासरी नांदण्यास पाठवत नसल्याने जावायाने सासऱ्याची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना अकोला जिल्ह्यातील पाथर्डी येथे ( Murder His Father in Law ) घडली. याप्रकरणी मृताच्या मुलीने दिलेल्या तक्रारीवर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी अवघ्या दोन तासांत संशयिताच्या मुसक्या आवळल्या ( Man Arrested ) आहेत.

अकोला - तेल्हारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाथर्डी येथील पहाट रक्तरंजित ठरली. जावयाने सासऱ्याचा धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना घडली ( Murder His Father in Law ) आहे. पत्नीला सासरी न पाठविल्याचा राग मनात ठेवून जावयाने सासऱ्याचा खून केला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, तेल्हारा पोलिसांनी आरोपी जावयास दोन तासांच्या आत अटक ( Man Arrested ) केली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाथर्डी येथील मृत गजानन पवार ( वय ५५ वर्षे ) यांच्या मुलीचा काही वर्षांपूर्वी उमरी येथे विवाह झाला होता. गेल्या चार महिन्यापासून मुलगी माहेरी आलेली होती. २३ एप्रिल रोजी आरोपी जावई निलेश विठ्ठल धुरंदर ( वय ३५ वर्षे, रा. उमरी ) हा आपल्या पत्नीला सासरी घेऊन जायला चार वाजेच्या दरम्यान गेला होता. मात्र, वडील घरी नाहीत त्यांना येऊ द्या नंतर बघू, असे म्हणत जावई धुरंदर हे थांबले. काही वेळाने मुलीचे वडील हे घरी आल्यानंतर त्यांच्या सोबत जावई वाद घालून तेथून निघून गेला. त्यानंतर रात्री अंगणामध्ये गजानन पवार हे खाटेवर झोपलेले असताना जावयाने त्यांना मध्यरात्री ३.३० वाजेच्या सुमारास सासऱ्याचा झोपेतच मानेवर धारदार चाकूने वार करत खून केला. त्यानंतर मृतक गजानन पवार यांनी अरडाओरड केली असता मृताची मुलगी धावत बाहेर आली. तिचा पती हातामध्ये चाकू घेऊन उभा होता. यावेळी पुन्हा वार करणार तोच मुलीने आरोपी पतीला ढकलून आरडाओरड केली. तेव्हा आरोपी तेथून पसार झाला.

गजानन पवार यांना वाचवण्याचा प्रयत्न केले. मात्र, रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन आरोपीचा शोध घेण्यासाठी वेगवेगळे पथक तयार करून जवळपास दोन तास शोध घेतला. खाकटा या गावानजीक पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

आरोपीच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून तेल्हारा पोलीस ठाण्यात कलम ३०२, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी अवघ्या दोन तासात आरोपीला अटक केली. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार ज्ञानोबा फड, पोलीस उपनिरीक्षक रमेश धामोडे, पोलीस शिपाई स्वप्नील सरोदे, योगेश उमक, राजेश्वर सोनोने, उमेश शिनगारे, अक्षय खोने, गजानन इंगळे, जयंत सोनटक्के, अनिल सिरसाट यांनी केली.

हेही वाचा - Gunratna Sadavarte Grant Bail : गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटलांना 'या' न्यायालयाकडून जामीन मंजूर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.