विधानपरिषद निवडणूक : महाविकास आघाडीचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया शरद पवारांच्या भेटीला

author img

By

Published : Nov 20, 2021, 9:10 PM IST

Mahavikas Aghadi candidate Gopikishan Bajoria met Sharad Pawar

स्थानिक स्वराज्य संस्थेतील विधान परिषद सदस्यांच्या निवडणुकीची (legislative council election 2021) प्रक्रिया सुरू झालेली आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात येत आहे. शिवसेना आणि महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांची भेट घेतली आहे.

अकोला - स्थानिक स्वराज्य संस्थेतील विधान परिषद सदस्यांच्या निवडणुकीची (legislative council election 2021) प्रक्रिया सुरू झालेली आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात येत आहे. शिवसेना आणि महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्याकडून महाविकासआघाडीतील मतदारांची मोट बांधण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. आमदार बाजोरिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांची भेट घेतली आहे. त्यासोबत ते काँग्रेसच्या नेत्यांच्याही संपर्कात आहेत. या निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार वसंत खंडेलवाल हे त्यांचे प्रतिस्पर्धी आहे. (mla gopikishan bajoria met sharad pawar)

मतदारसंघांमध्ये 821 मतदार -

अकोला, वाशिम, बुलढाणा या मतदार संघासाठी विधान परिषदेची निवडणूक 10 डिसेंबर रोजी होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकारी यांच्या माध्यमातून विधान परिषदेसाठी आमदार निवडण्यात येणार आहे. या निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया हे चौथ्यांदा निवडणूक रिंगणात उभे आहेत. तर भाजप.कडून नवा चेहरा म्हणून वसंत खंडेलवाल हे उमेदवार आहेत. या मतदारसंघांमध्ये 821 मतदार आहेत. यामध्ये महा विकास आघाडीचे मतदार यांची संख्या जास्त आहे. त्या खालोखाल भाजपच्या सव्वातीनशेच्या जवळपास मतदार आहेत.

हेही वाचा - ED summons to Bhavana Gawali : शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना ईडीकडून पुन्हा समन्स

निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष -

या निवडणुकीमध्ये महा विकास आघाडीच्या पक्षातील लोकप्रतिनिधींना आपल्याकडे वळविण्यासाठी विद्यमान आमदार तथा शिवसेनेचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया हे प्रयत्न करीत आहेत. आधीपासून ते त्यांच्या संपर्कमध्ये आहे. या सोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी मुंबई येथे भेट घेतली आहे. तसेच काँग्रेसच्या नेत्यांच्या सोबतही ते संपर्कात आहे. गोपीकिशन बाजोरिया यांना यावेळी भाजपकडून कडवे आव्हान मिळत असल्यामुळे ते महाविकास आघाडीतील मतदारांच्या संपर्कात असून त्यांची मोट बांधण्यासाठी ते आटोकाट प्रयत्न करीत आहेत. या निवडणुकीत बाजोरिया आपला चमत्कार दाखवतील का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.