Legislative Council Election : अकोला मतदारसंघात 'वंचित'चे मतदार किंगमेकर ठरणार?

author img

By

Published : Nov 24, 2021, 12:12 PM IST

Updated : Nov 24, 2021, 12:26 PM IST

विधानपरिषद निवडणूक

भाजपाकडे तिनही जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती, नगरपरिषद व महानगरपालिकेचे नगरसेवक आणि जिल्हा परिषदचे सदस्यांची संख्या पकडली तर ती तिनशेच्या जवळ जात आहे. तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकार्‍यांची सदस्य संख्या पकडली तर चारशेच्या वर जात आहे.

अकोला - विधानपरिषद निवडणुकीमध्ये (Legislative Council elections) भाजपाकडून वसंत खंडेलवाल तर शिवसेना आणि महाविकास आघाडीकडून विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया (MLA Gopikishan Bajoria) यांच्यामध्ये सामना होत आहे. या दोघांकडे विजयाचा दावा असला तरी भाजपाकडे तीनशे मतदार आहेत. तर महाविकास आघाडीकडे (Mahavikas Aghadi) चारशेच्यावर मतदार आहे. मात्र या दोघांनाही वंचित बहुजन आघाडीच्या (vanchit bahujan aaghadi) मतदारांची विजयासाठी गरज भासणार आहे. परिणामी, हे दोन्ही उमेदवार वंचितचे मतदार मिळविण्यासाठी जोर लावत आहे. परंतु वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी अद्यापही कोणत्या उमेदवाराला मतदान करावे, असा आदेश काढलेला नसल्याने या दोघांच्याही विजयाचा जोर सध्या नमलेला आहे. त्यामुळे या निवडणुकीत विजयासाठी वंचितच निर्णायक ठरणार असल्याचे चित्र आहे.

वंचित बहुजन आघाडी
वंचित बहुजन आघाडी

भाजपाकडून नवा चेहरा -

अकोला विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया हे चौथ्यांना निवडणुक रिंगणात उभे आहे. तर भाजपाकडून नवा चेहरा आणि सराफा व्यापारी वसंत खंडेलवाल (Vasant Khandelwal) यांचे नाव जाहीर झालेले आहे. या दोन्ही उमेदवारांमुळे या निवडणुकीत चांगलीच रंगत निर्माण झाली आहे. परिणामी, ही निवडणुक जिंकण्यासाठी शिवसेनेचे आमदार बाजोरिया यांची मात्र कसरत आहे. विजयाचा दावा करणार्‍या भाजपकडेही इतर पक्षाचे मतदार जोडण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहेत.

मतदारसंघात 821 मतदार -

भाजपाकडे तिनही जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती, नगरपरिषद व महानगरपालिकेचे नगरसेवक आणि जिल्हा परिषदचे सदस्यांची संख्या पकडली तर ती तिनशेच्या जवळ जात आहे. तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकार्‍यांची सदस्य संख्या पकडली तर चारशेच्या वर जात आहे. या दोघांमधील मतदारांच्या आकड्याचे अंतर हे कमी असले तरी वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकारी हे 85 च्या जवळपास आहे. मतदारसंघात 821 मतदार आहेत. 821 मतदारांची संख्या लक्षात घेता महाविकास आघाडीचे पारडे जड आहे. परंतु, भाजपाला जर वंचित बहुजन आघाडीने मदत केली तर भाजपा या निवडणुकीत सहज विजय मिळवू शकतो. या दोन्ही उमेदवारांकडून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना मनविण्यासाठी छुप्या पद्धतीने प्रयत्न सुरू आहे. परंतु, अद्यापपर्यंत वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी अद्याप आपले पत्ते उघड केले नाही. त्यामुळे या निवडणुकीत कोणाकडून वंचित बहुजन आघाडी मतदान करेल, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रकाश आंबेडकर
प्रकाश आंबेडकर

वंचित ठरणार किंगमेकर -

वंचित बहुजन आघाडी विजयासाठी किंगमेकर ठरणार असल्याने शिवसेनेचे उमेदवार तथा विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया आणि भाजपचे उमेदवार वसंत खंडेलवाल या दोघांकडून किंगमेकर वंचितला आपल्याकडे ओढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. सध्या निवडणुकीत अजूनपर्यंत पक्षाकडून कुठल्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला नाही. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे निर्णय घेतील. आमचे 85 लोकप्रतिनिधी हे निवडणुकीत मतदान करतील, अशी प्रतिक्रिया प्रदेश उपाध्यक्ष प्रा. धैर्यवर्धन पुंडकर यांनी दिली आहे.

Last Updated :Nov 24, 2021, 12:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.