अकोला : कुरणखेड तलावांमध्ये पितापुत्र बुडाले

author img

By

Published : Oct 18, 2021, 3:56 PM IST

FATHER SON DUO DROWN IN KURANKHED POND

वडील सुनील वाघडकर (50), मुलगा अभिषेक वाघडकर (21) असे बुडालेल्या पितापुत्रांची नावे आहे. याचबरोबर तेल्हारा तालुक्यातील एक जण बुडाल्याची माहिती मिळाली आहे. नवरात्रीसाठी देवीचे विसर्जन करताना ही घटना घडली.

अकोला - देवी विसर्जनाच्यावेळी पितापुत्र बुडाल्याची घटना रविवारी रात्री कुरणखेड येथील तलावात घडली होती. या दोघांचा शोध सोमवारी पहाटेपासून वंदे मातरम आपत्कालीन पथकाने घेतला. तासाभरात या पितापुत्रांचा शोधण्यात पठकाला यश मिळाले आहे. या दोघांनाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील शवविच्छेदन गृहात ठेवण्यात आले आहे.

कुरणखेड तलावांमध्ये पितापुत्र बुडाले

वडील सुनील वाघडकर (50), मुलगा अभिषेक वाघडकर (21) असे बुडालेल्या पितापुत्रांची नावे आहे. याचबरोबर तेल्हारा तालुक्यातील एक जण बुडाल्याची माहिती मिळाली आहे. सुनीव वाघडकर हे जुन्या शहरातील शिवसेना वसाहतीतील तानाजी चौक येथील देवीचे विसर्जन करण्यासाठी गेले होते. त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते वाहत गेल्याचे मुलगा अभिषेकच्या लक्षात आले. त्याने वडिलांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोही त्यात बुडाला. रात्रीची घटना असल्याने त्या दोघांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यांचा शोध घेण्यासाठी कुरणखेड येथीलश्री चंडिका माता आणि वंदे मातरम आपत्कालीन बचाव पथक कुरणखेड यांच्यातर्फे शोध मोहीम सुरू होती. रात्र आणि पाऊस सुरू असल्याने शोध पथकास अडथळे निर्माण होत होते. त्यामुळे ही शोध मोहीम थांबविण्यात आली. घटनास्थळी बोरगांवचे मंजू पोलिस दाखल झाले होते. सोमवारी सकाळी परत या दोघांची शोधमोहीम सुरू करणार आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

AKOLA
रेसक्यू टीम
दोघाचे मिळाले मृतदेह

या दोघांचा शोध पहाटे पाच वाजता पासून वंदे मातरम आपत्कालीन पथक, कुरणखेड यांनी त्यांचा शोध घेतला. तासाभरात ते दोघे तलावातील आतमधल्या कपारीत अडकलेल्या अवस्थेत मिळून आले. या दोघांनाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील शवविच्छेदन गृहात ठेवण्यात आले आहे. आणखी एक व्यक्ती हा तेल्हारा येथे वाहून गेला असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख एस. एस. साबळे यांनी दिली आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी शोध पथके गेली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

हेही वाचा - शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट, उपमुख्यमंत्र्यांचीही उपस्थिती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.