Woman death in bus : धावत्या बसमध्ये महिलेला मृत्यूने गाठले; श्रीगोंदा ते धुळे बस थेट कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात

author img

By

Published : Sep 30, 2022, 4:02 PM IST

Woman death in bus

अहमदनगर येथून बसून नंदुरबारच्या दिशेने जात असलेल्या महिलेला धावत्या बस मध्ये मृत्यूने गाठले ( Woman Heart Attack in Bus ) आहे. याबाबत कोपरगाव शहर पोलीस ( Kopargaon City Police Station ) ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कोपरगाव : राज्य परिवहन महामंडळाच्या ( Maharashtra State Road Transport Corporation ) श्रीगोंदा धुळे बसमध्ये अहमदनगर येथून बसून नंदुरबारच्या दिशेने जात असलेल्या नबाबाई दगडू सोनवणे वय अंदाजे 45 वर्ष या महिलेला धावत्या बसमध्ये मृत्यूने गाठले ( Woman Heart Attack in Bus ) आहे. सदर घटना 29 सप्टेंबर रोजी घडली असून, हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने सदर महिलेचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात ( Kopargaon City Police Station ) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


नेमके काय घडले : नबाबई दगडू सोनवणे वय 45 वर्ष राहणार नंदुरबार हे अहमदनगर येथून गुरुवारी दुपारच्या सुमारास नंदुरबारला जाण्यासाठी आपला मुलगा महेंद्र दगडु सोनावणे व बहीण विमलबाई यांच्या सोबत श्रीगोंदा धुळे बस मध्ये बसले होते व धुळ्यापर्यंत तिकीट काढलं होतं. शिर्डी बस स्थानकावरून कोपरगावच्या दिशेने बस निघाली असता नबाबाई यांना चक्कर येत असल्याचे त्यांनी आपल्या मुलाला सांगितले. मुलाने सदर बाबत वाहकाचे निदर्शनास आणून दिल्याने वाहक संजय मच्छिंद्र तांदळे व चालक नवनाथ लक्ष्मण पालवे यांनी तत्काळ महिलेकडे जाऊन माहिती घेतली असता त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. कोपरगांव बस आगारात बस पोहचल्या नंतर सदर महिला बेशुद्ध असल्याचे चालक वाहकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी सहाय्यक वाहतूक निरीक्षक अविनाश गायकवाड व वाहतूक नियंत्रक राजेंद्र भागवत यांना ही बाब निदर्शनास आणून दिली. बस आगारातील अधिकाऱ्यांनी बसमधील असलेले प्रवासी दुसऱ्या बसमध्ये शिफ्ट करून सदर बस कोपरगाव ग्रामीण रुग्णालय येथे नेली. यावेळी ग्रामीण रुग्णालयात उपस्थित वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमित नाईकवाडे यांनी या महिलेला मृत घोषित केले. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर सदर महिलेचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमित नाईकवाडे यांनी म्हटले आहे.

महिलेला मृत्यूने गाठले



नातेवाईकांना पुढील प्रवासाचे तिकिटाचे पैसे परत : यावेळी आगर व्यवस्थापक अभिजीत चौधरी यांच्या सूचनेनुसार मृत महिलेच्या नातेवाईकांना पुढील प्रवासाचे तिकिटाचे पैसे परत करण्यात आले. यावेळी सहवाहतूक निरीक्षक अविनाश गायकवाड वाहतूक नियंत्रण राजेंद्र भागवत, राजू वाघमारे यांनी सदर महिलेला ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यास सहकार्य केले. याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करीत आहे.


ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.