साईभक्तांसाठी खुशखबर.. शिर्डीतील प्रसादालय व लाडू प्रसाद पुन्हा होणार सुरू

author img

By

Published : Nov 24, 2021, 10:24 PM IST

Updated : Nov 24, 2021, 10:37 PM IST

sai baba Prasadalaya

शिर्डीतील सामाजिक कार्यकर्ते दिगंबर कोते यांच्या उपोषणाला आज सातव्या दिवशी यश आले. भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी निस्वार्थपणे उपोषणाचा पावित्रा घेतलेल्या कोते यांच्या प्रमुख चार मागण्या मान्य झाल्याने आज सातव्या दिवशी त्यांचे उपोषण सुटले आहे.

शिर्डी (अहमदनगर) - शिर्डीतील सामाजिक कार्यकर्ते दिगंबर कोते यांच्या उपोषणाला आज सातव्या दिवशी यश आले. भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी निस्वार्थपणे उपोषणाचा पावित्रा घेतलेल्या कोते यांच्या प्रमुख चार मागण्या मान्य झाल्याने आज सातव्या दिवशी त्यांचे उपोषण सुटले आहे.

गेल्या सात ऑक्टोबरपासून शिर्डीचे साईबाबा मंदिर भाविकांसाठी खुले झाले. मात्र कोविडच्या पार्श्वभूमीवर भोजनालय बंद ठेवण्यात आले होते. साईदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या भोजनाचा प्रश्न बिकट होत चालला होता. खासगी भोजनालयात वाजवी पेक्षा अधिक पैसे घेवून भाविकांची लुट सुरु होती. त्यामुळे साईप्रसादालय सुरु करावे, ही प्रमुख मागणी घेवून शिर्डीतील दिगंबर कोते 18 नोव्हेंबरपासून द्वारकामाई समोर उपोषणास बसले होते. अखेर आज सातव्या दिवशी त्यांच्या चार मागण्या प्रशासनाने मान्य केल्याने त्यांचे उपोषण सुटले आहे. यावेळी राहाता तहसिलदार कुंदन हिरे यांच्या प्रयत्नानंतर मंडलाधिकारी अम्ल गुगळे, तलाठी रमेश झेंडे, शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या वतीने पत्र देण्यात आले.

शिर्डीतील प्रसादालय व लाडू प्रसाद पुन्हा होणार सुरू
साईभक्‍त व शिर्डी ग्रामस्‍थ यांच्‍याकडून साईप्रसादालय सुरु करण्‍याबाबत वारंवार मागणी होत होती. त्‍यानुसार संस्‍थानच्‍या वतीने दिनांक 8 नोव्‍हेंबर 2021 व दिनांक 23 नोव्‍हेंबर 2021 रोजी जिल्‍हाधिकारी यांना प्रस्‍ताव सादर करण्‍यात आलेला होता. त्‍या प्रस्‍तावास अनुसरुन दिनांक 23 नोव्‍हेंबर 2021 रोजी जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाची जिल्‍हाधिकारी यांचे अध्‍यक्षतेखाली बैठक घेण्‍यात येऊन भाविकांसाठी साईप्रसादालय व लाडु प्रसाद वाटपास काही अटी शर्तीवर परवानगी देण्‍यात आली असल्याची माहिती साई संस्थानचा मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली आहे.येत्या 26 नोव्‍हेंबर 2021 रोजी पासून साईप्रसादालय भाविकांसाठी सुरू करण्‍यात येणार आहे. सर्व साईभक्‍तांनी कोविड-१९ च्‍या नियमांचे पालन करुन प्रसाद भोजनाचा लाभ घ्‍यावा. तसेच सर्व साईभक्‍तांनी व ग्रामस्‍थांनी संस्‍थानला सहकार्य करावे, असे आवाहन बानायत यांनी केले आहे.
Last Updated :Nov 24, 2021, 10:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.