RBI Restrictions on Nagar Urban Bank - नगर अर्बन बँकेवर आरबीआयचे निर्बंध, सहा महिन्यांसाठी निर्बंध लागू राहणार

author img

By

Published : Dec 7, 2021, 7:38 AM IST

अहमदनगर- नगर अर्बन बँकेवर आरबीआय कडून निर्बंध

नगर अर्बन बँकेवर भारतीय रिझर्व बँकेने पुढील सहा महिन्यांसाठी निर्बंध आणले असून ठेवीदारांना दहा हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही. ( Nagar Urban Bank Reserve Bank of India ) बँकेच्या संचालक मंडळाला कोणतेही नवीन कर्ज मंजुरी, ऍडव्हान्स, गुंतवणूक करण्यासाठी बंधने आणली असून यासाठी रिझर्व बँकेची परवानगी घेणे गरजेचे असणार आहे. ( Reserve Bank Restrictions on Ahmednagar Urban Bank ) बँकेची येणाऱ्या काळात आर्थिक प्रगती पाहून याबाबत पुढील निर्णय आरबीआय घेणार आहे. हा निर्णय आज सहा डिसेंबरपासून पुढील सहा महिन्यांसाठी लागू असणार आहे.

अहमदनगर - नगर अर्बन बँकेवर भारतीय रिझर्व बँकेने पुढील सहा महिन्यांसाठी निर्बंध आणले असून ठेवीदारांना दहा हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही. बँकेच्या संचालक मंडळाला कोणतेही नवीन कर्ज मंजुरी, ऍडव्हान्स, गुंतवणूक करण्यासाठी बंधने आणली असून यासाठी रिझर्व बँकेची ( Loan Approval, Advance, Investment Reserve Bank ) परवानगी घेणे गरजेचे असणार आहे. ( Board of Directors Ahmednagar Urban Bank ) बँकेची येणाऱ्या काळात आर्थिक प्रगती पाहून याबाबत पुढील निर्णय आरबीआय घेणार आहे. हा निर्णय आज सहा डिसेंबरपासून पुढील सहा महिन्यांसाठी लागू असणार आहे. ( Deposits of Ahmednagar Urban Bank ) मात्र, एकूणच बँकेची येणाऱ्या काळात असणारी आर्थिक परिस्थिती आणि प्रगती पाहून आरबीआय पुढील निर्णय घेऊ शकते. त्यासंदर्भात सोमवारी सायंकाळी आरबीआयने एक प्रेस रिलीज काढून याबाबत माहिती दिलेली आहे.

प्रतिक्रिया देताना पदाधिकारी
बँकेच्या माजी संचालक मंडळावर अनेक आरोप!

माजी खासदार स्व. दिलीप गांधी हयात असताना चौदाशे कोटींच्या ठेवी बँकेत होत्या. ( Dilip Gandhi Ahmednagar Urban Bank ) ) मात्र, त्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या संचालक मंडळ कार्यरत असताना बँकेत मोठया प्रमाणात अनियमितता उघड झाली. बोगस कर्जे, आगाऊ रकमा, बनावट सोने तारण, चिल्लर घोटाळा, बँक मिटिंगमध्ये गुटखा खर्च लावणे असे अनेक प्रकार चर्चेत आले. ( Bogus account holder of Ahmednagar Bank ) संचालक मंडळावर पुण्यात गुन्हा दाखल आहे. काही बोगस खातेदारांवर गुन्हे दाखल आहे. शेवगाव शाखेतील बनावट सोने प्रकरणी गुन्हा दाखल असून तेथील बँक व्यवस्थापकाने आत्महत्या केली. अशा अनेक प्रकरणानंतर आरबीआयने 2019 ला बँकेवर आरबीआयचा प्रशासक नेमत संचालक मंडळ बरखास्त केले होते.

नव्या संचालक मंडळाने नुकताच स्वीकातला पदभार

माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी बँकेतील अनियमितता, गैरप्रकारांबाबत सातत्याने आवाज उठवला. प्रशासकाच्या काळात एनपीए कमी होण्याऐवजी वाढला गेला, ठेवी सातशे कोटींपर्यंत खाली आल्या. ( New Board of Directors of Ahmednagar Nagar Urban Bank ) काही माजी संचालकांनी ही बाब आरबीआयकडे मांडून प्रशासकाऐवजी निवडणूक घेऊन बँकेची परस्थिती सुधारेल अशी मागणी केली होती. आरबीआयने निवडणुकीला परवानगी दिल्यानंतर गेल्या महिन्यातच निवडणूक पार पडली आणि बँकेत पुन्हा एकदा दिलीप गांधी प्रणित सहकार पॅनलचे सर्व अठरा उमेदवार संचालक म्हणून निवडले गेले. बँकेच्या संचालक बैठकीत राजेंद्र आगरवाल यांना बँकेचे चेअरमन तर स्व.दिलीप गांधी यांच्या सुनबाई दीप्ती गांधी यांना व्हाईस चेअरमनपदी एकमताने निवडण्यात आले. एक तारखेला पदभार घेतल्यानंतर अवघ्या सहाव्या दिवशीच आरबीआयने बँकेवर कडक आर्थिक निर्बंध पुढील सहा महिन्यांसाठी लागू केल्याने बँक वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे.

बँकेने ठेवीदारांना दिले स्पष्टीकरण-

बँकेचे चेअरमन राजेंद्र आगरवाल यांनी सायंकाळी एक प्रेसनोट द्वारे ठेवीदार, खातेदारांनी घाबरून जाऊ नये, बँक थकीत कर्जे वसुल करत नव्या ठेवी बँकेत येण्यासाठी प्रयत्न करत असून बँकेची आर्थिक परिस्थिती चांगली असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. येत्या काही महिन्यांत आर्थिक परिस्थिती सुधारून आरबीआयकडून निर्बंध हटवण्यात येतील असा आशावाद पत्रकात व्यक्त करण्यात आला आहे.

हेही वाचा - ST Workers Return To Work : राज्यातील 105 आगारातून वाहतूक सुरू; तर 19 हजार कर्मचारी पुन्हा कामावर रुजू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.