साई संस्थानच्या नवनियुक्त अध्यक्षांसह नऊ विश्वस्तांनी स्विकारला पदभार

author img

By

Published : Sep 17, 2021, 9:04 PM IST

Updated : Sep 17, 2021, 9:20 PM IST

साई संस्थान पदभार

औरंगाबाद उच्च न्यायालयाने विश्वस्त मंडळ नेमण्याचे आदेश दिल्यानंतर साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ कधी जाहीर होते आणि त्यावर कोणाची वर्णी लागते यांची उत्सुकता होती. अखेर राज्य सरकाने काल (गुरुवारी) रात्री विश्वस्त मंडळाची घोषणा केल्यानंतर आज दुपारी कोपरगावचे राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांनी शिर्डीत येवून साई संस्थानच्या अध्यक्षपदाचा पदभार स्विकारला आहे. यावेळी मात्र शिवसेनेच्या कोट्यातील उपाअध्यक्ष अँड. जगदिश हरीषचंद्र सावंत आणि युवा सेनेचे राहुल कनाल हे अनुपस्थीत होते.

शिर्डी (अहमदनगर) - गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांची साईबाबा संस्थान अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर जगदीश सावंत यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. एकूण 12 जणांचे विश्वस्त मंडळ राज्य सरकारडून जाहीर करण्यात आले आहे. यातील अध्यक्ष अशुतोष काळेंसह नऊ जणांनी आज (शुक्रवारी) शिर्डीत येवून आपल्या विश्वस्त पदाचा पदभार स्विकारला आहे.

साई संस्थानच्या नवनियुक्त अध्यक्षांसह नऊ विश्वस्तांनी स्विकारला पदभार

औरंगाबाद उच्च न्यायालयाने विश्वस्त मंडळ नेमण्याचे आदेश दिल्यानंतर साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ कधी जाहीर होते आणि त्यावर कोणाची वर्णी लागते यांची उत्सुकता होती. अखेर राज्य सरकाने काल (गुरुवारी) रात्री विश्वस्त मंडळाची घोषणा केल्यानंतर आज दुपारी कोपरगावचे राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांनी शिर्डीत येवून साई संस्थानच्या अध्यक्षपदाचा पदभार स्विकारला आहे. यावेळी मात्र शिवसेनेच्या कोट्यातील उपाअध्यक्ष अँड. जगदिश हरीषचंद्र सावंत आणि युवा सेनेचे राहुल कनाल हे अनुपस्थीत होते. साई संस्थानचे अध्यक्षपद स्विकाल्यानंतर काळे यांनी शिर्डीत येणाऱ्या साईभक्तांच्या सुविधेला प्राधान्य दिल जाईल, असे सांगितले आहे. कोरोनामुळे सध्या मंदीर बंद आहे. राज्य सरकार लवकरच मंदीर उघडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

'यांनी' स्विकारला पदभार

राज्य सरकारने अधिकृत नावांची घोषणा केली असून या यादीत अहमदनगर जिल्ह्याला झुकते माप देण्यात आल्याचे दिसून येत आहे. अध्यक्ष आशुतोष काळे यांच्यासह अहमदनगर जिल्ह्यातील 9 जणांना विश्वस्त मंडळात संधी देण्यात आली आहे. याप्रसंगी आशुतोष काळे यांच्या समवेत सलग तिसऱ्यांदा विश्वस्त झालेले डॉ.एकनाथ गोंदकर, सुरेश वाबळे, श्रीरामपूरच्या नगराध्यक्षा अनुराधा आदिक, महेंद्र शेळके, सचिन गुजर, अविनाश दंडवते, जयंत जाधव, सुहास आहेर आदींनी पदभार स्वीकारला आहे. तसेच पदसिद्ध सदस्य म्हणून भाजपाचे शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनीही पदभार स्विकारला आहे. यावेळी साईसंस्थांनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी नुतन विश्वस्त मंडळाचा सत्कार केला. साईभक्तांच्या सुविधेसाठी सहकारी विश्वस्त संस्थान अधिकारी कर्मचारी आणि शिर्डीकर ग्रामस्थ यांच्या विचारातून विकास काम करण्याचा निर्धार नुतन अध्यक्ष आशुतोष काळे यांनी व्यक्त केला आहे. साईभक्त असलेल्या उद्धव ठाकरेंनी सेनेच्या कोट्यातील शिवसेनेचे तीन आणि कॉंग्रेसच्या दोन सदस्यांची नेमणुक होणे अद्याप बाकी आहे.

हेही वाचा - चारधाम यात्रेचा 18 सप्टेंबरपासून उत्तराखंडमध्ये पुन्हा श्रीगणेशा

Last Updated :Sep 17, 2021, 9:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.