Goat Theft In Shirdi : कारमधून शेळ्यांची चोरी, पोलिसांनी केला चोरांचा सिनेस्टाईल पाठलाग

author img

By

Published : Jan 24, 2023, 4:02 PM IST

Etv Bharat

स्विफ्ट डिझायर कारमधून चक्क शेळ्यांची चोरी होत असल्याचा धक्कादायक प्रकार अहमदनगरच्या कोपरगाव शहरात उघडकीस आला आहे. एका कारमध्ये शेळ्यांना बसवून चोर घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी सिनेस्टाईल कारचा पाठलाग केला. शहराच्या मुख्य भागात हा सर्व प्रकार सोमवारी सकाळी सुरू होता. अखेर मोठ्या शिताफीने पोलिसांनी पाठलाग करुन चारचाकी वाहनासह तीन शेळ्या, दोघांना ताब्यात घेतले आहे.

शिर्डी - कोपरगाव शहरात सोमवारी आठवडे बाजार असल्याने शहरातील बैल बाजार रोड येथे जनावरांचा मोठा बाजार भरतो. त्या बाजारात एका कारमधून शेळ्या घेऊन येत असल्याची माहिती गुप्त बातमीदारांकडून पोलिसांना मिळाली हाती. पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी पोलीस यंत्रणा तातडीने सतर्क करून एक पथक बाजारात पाठवले.

चोरांचा पळून जाण्याचा प्रयत्न - यामध्ये पोलीस कर्मचारी यमुनाजी सुंबे, जलिंधर तमनर, सचिन शेवाळे यांनी शेळ्या घेवून जाणाऱ्या गाडीवर पाळत ठेवली. त्यांना बैल बाजार येथे पांढऱ्या रंगाची एम एच ०४ एफ आर ४२७९ क्रमांकाच्या चारचाकी गाडीत तीन व्यक्ती तीन शेळ्या घेवून जात असल्याची खात्री पटली. पोलीसांनी गाडीचा पाठलाग सुरु केला. चोरांना पोलीस आपला पाठलाग करत आल्याचे लक्षात येताच ते परत शहराच्या बाहेर निघण्यासाठी गर्दीतून सुसाट गाडी चालवुन पळून जाण्याच्या तयारीत होते.

सिनेस्टाईल पाठलाग - अगदी चिञपटा सारखा थरार अर्धा तास सुरू होता. चोरांनी शहरातील लोकशाही अण्णाभाऊ साठे पुतळ्याच्या जवळ पोलीसांना चकवा देण्याच्या प्रयत्नात त्यांची चारचाकी गाडी रस्त्यावरील दुभाजकाला धडकली. तितक्यात पाठलाग करणारे दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी गाडीतल्या दोघांना पकडले. परंतू त्यापैकी एक चोर पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलीसांनी चारचाकी गाडीची झाडाझडती घेतली असता चोरून आणलेल्या तीन शेळ्या आढळूनआल्या.

या प्रकरणात चौघांचा सामावेश - पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी चोरांना पोलीसी खाक्या दाखवताच गाडीतल्या शेळ्या ह्या विविध ठिकाणातील शेतकऱ्यांच्या चोरल्याचे चोरांनी कबुल केले. पळून गेलेल्यासह या प्रकरणात चौघांचा सामावेश असुन शेळ्या चोरणारे चोर राहता तालुक्यातील असल्याची प्राथमिक माहीती देण्यात आली. दोघां चोरांचा शोध घेण्यासाठी पोलीसांनी पकडलेल्या चोरांची नावे गुप्त ठेवली आहे.

शेतकऱ्याला मिळाल्या शेळ्या - सोमवारी पहाटे कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील शेतकरी बाळासाहेब बाबुराव नन्नोरयांच्या घरासमोरील पञ्याच्या शेडमध्ये बांधलेल्या दोन शेळ्या अंदाजे ११ हजार रुपये किंमतीच्या अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची तक्रार शहर पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली आहे. यावरुन चोरट्यांनी पहाटे चोरलेल्या शेळ्या आठवडे बाजारात विकण्याची तयारी केली होती, पण पोलीसांच्या सतर्कतेमुळे शेळ्या चोरणारी टोळी गजाआड झाली. शेतकरी नंनोर यांच्या दोन शेळ्या त्यांना परत मिळाल्या तर, एक शेळी मूळ मालक मिळेपर्यंत त्यांना सांभाळण्यासाठी देण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहे.




हेही वाचा - Zaveri Bazaar Loot: फिल्मी स्टाईलने 2 कोटींची लूट, बोगस ईडी अधिकाऱ्यांनी झवेरी बाजारमध्ये टाकला छापा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.