Farmers Agitation : गाईच्या दुधात चार रुपयांनी घट; दुधाचे दर पाडण्याचे संघटित षडयंत्र हाणून पाडू या - डॉ. अजित नवले
Published: May 22, 2023, 8:12 PM


Farmers Agitation : गाईच्या दुधात चार रुपयांनी घट; दुधाचे दर पाडण्याचे संघटित षडयंत्र हाणून पाडू या - डॉ. अजित नवले
Published: May 22, 2023, 8:12 PM
उन्हाळ्यात दुध आणि दुग्धजन्य पदार्थाला चांगली मागणी असतानाही दुधाच्या दरात कपात केली जात आहे. ही कपात खाजगी दूध संघ मिळुन करत असल्याचा आरोप किसान सभेचे डॉ.अजित नवले यांनी केला आहे. तर हे षडयंत्र हाणून पाडण्याचे आवाहन देखील त्यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
अहमदनगर: पूर्वी शेतीला जोड धंदा म्हणुन शेतकरी दूध व्यवसायाकडे पाहत होता. मात्र मध्यतरी वाढलेल्या दरांमुळे शेतकरी अधुनिक पद्धतीने दुध व्यावसायाकडे वळला आहे. तर राज्यात उन्हाळ्यात टंचाई काळ असल्याने दुधाचे भाव वाढलेले असतात. यावर्षी मात्र उलटे गणीत झाले आहे. ऐन उन्हाळ्याच्या तडाख्यात दूधाचे दर तिन ते चार रुपयांनी कमी झाले आहे. पशुखाद्य व वैरणीचा वाढलेला खर्च व पडलेले दूधाचे दर यामुळे दूध उत्पादक शेतकरी पुरता हैराण झाल्याचे चित्र आहे.
उन्हाळ्यात दुधाचे दर पाडले: गेल्या महिन्यात अजीत नवले यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी अकोले ते लोणी असा लॉग मार्च काढला होता. त्याचवेळी नवले यांनी उन्हाळ्यात दूधाचे दर पाडले जातील असे म्हटले होते. त्या नुसार गेल्या 20 दिवसांत गाईच्या दूधात सुमारे चार रुपयांनी घट झाली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून टिकून असलेला गाईच्या दूधाचा 38 रुपयांचा दर घसरून 34 रुपयांवर आला आहे.
आंदोलन करण्याचे केले आवाहन: दूध दर पाडण्यात खाजगी दूध संघाचा वाटा आहे. हे सर्व मिळुन दुध दर पाडतात. आता दुधदर हे पंचवीस रुपया पर्यंत हे दूध संघावाले घेऊन जातील असे सांगत, नवले यांनी दूध उत्पाकांची ही संघटीत लुट होत असल्याचे म्हटले आहे. ही संघटीत लुट थांबवण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी घरात बसन्या ऐवजी एकत्र येऊन एकाच दिवशी महाराष्ट्रातील दूध संघावर आंदोलन करण्याच आवाहन केले आहे. जसे दूध कंपन्या एकत्र येतात तसे दूध उत्पादक संघटनाचे नेते यांनी आपसी समन्वय करून दूध उत्पादकच्या रक्षनासाठी एकत्र यावे असेही म्हटले आहे.
हेही वाचा -
