Chain Snatching Ahmednagar : भाजी विक्रेत्याची चैन स्नॅचिंग करत कोयत्याने हल्ला

Chain Snatching Ahmednagar : भाजी विक्रेत्याची चैन स्नॅचिंग करत कोयत्याने हल्ला
सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास भाजी विक्रेते बाळासाहेब तरोटे हे मार्केटयार्ड मध्ये जात असताना जुने कोर्ट परिसरात दुचाकीवर आलेल्या तीन चोरट्यांनी बाळासाहेब तरोटे यांना जबरदस्त मारहाण करत त्यांच्या गळ्यातील दहा तोळ्याची सोन्याची चैन आणि खिशातील रोख रक्कम चोरट्यांनी पळवून नेली आहे.
अहमदनगर - शहरात चैन स्नॅचिंगचे प्रकार पुन्हा वाढू लागले असून महिलांसह आत गळ्यात चैन असलेले पुरुषही या चोरट्यांचे लक्ष झाले आहेत. सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास भाजी विक्रेते बाळासाहेब तरोटे हे मार्केटयार्ड मध्ये जात असताना जुने कोर्ट परिसरात दुचाकीवर आलेल्या तीन चोरट्यांनी बाळासाहेब तरोटे यांना जबरदस्त मारहाण करत त्यांच्या गळ्यातील दहा तोळ्याची सोन्याची चैन आणि खिशातील रोख रक्कम चोरट्यांनी पळवून नेली आहे.
कोयत्याने हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद -
बाळासाहेब यांनी चोरट्यांचा प्रतिकार केला असता चोरट्यांनी बाळासाहेब तरोटे यांना जबरदस्त मारहाण केली आहे. विशेष म्हणजे चोरांच्या हातात कोयत्या सारखे धारदार शस्त्र होते. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून यासंदर्भात कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गस्त वाढवण्याची मागणी -
बाळासाहेब तरटे या घटनेत गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.तर चेन स्नॅचिंग करणारी चोरट्यांची टोळी पुन्हा सक्रिय झाल्या असल्याचं या प्रकरणावरून दिसून येत आहे. त्यामुळे पहाटे फिरायला जाणाऱ्या नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
