Sangamner ATM Blast : संगमनेरमध्ये जिलेटिनचा स्फोट करुन फोडले एटीएम; चार लाखांहून अधिक रोकड लंपास

author img

By

Published : Dec 6, 2021, 5:55 PM IST

Sangamner ATM Blast

संगमनेर तालुक्यातील समनापूर येथे चोरट्यांनी एटीएम फोडून (Sangamner ATM Blast) चार लाखांहून अधिक रोकड लंपास केल्याचं धक्कादायक घटना समोर आलं आहे.

अहमदनगर - संगमनेर तालुक्यातील समनापूर येथे चोरट्यांनी एटीएम फोडून (Sangamner ATM Blast) चार लाखांहून अधिक रोकड लंपास केल्याचं धक्कादायक घटना समोर आलं आहे. जिलेटिनचा स्फोट (Gelatin Blast in Samgamner) करून हे एटीएम फोडल्याने एटीएमचे अक्षरशः तुकडे झालेले आहे. या घटनेनी तालुक्यात खळबळ उडाली आहे.

पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास चोरी -

संगमनेर तालुक्यातील समनापूर बाजारपेठेत पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही चोरी झाली. इंडिया नंबर वन (India 1 ATM) कंपनीच्या एटीएमला चोरट्यांनी लक्ष्य केले. सकाळी स्थानिक नागरिकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती कळवण्यात आली. पोलिसांना घटनास्थळी एटीएमचे अक्षरशः तुकडे झालेले आढळून आले. काही वेळातच स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांसह श्वान पथक व फॉरेन्सिकचे पथक घटनास्थळी पोहोचले. चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न सुरू असून अद्याप कुठलेही धागेदोरे हाती लागले नाहीत. चोरट्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फूटेजही ताब्यात घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

लोणी खुर्दयेथील घटनेची पुनरावृत्ती -

गेल्या काही महिन्यांपूर्वी राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथे श्रीरामपूर-संगमनेर रोडवरच वेताळबाबा चौकात असणारे एटीएम चोरट्यांनी अशाच पद्धतीने जिलेटिनचा स्फोट करून फोडले होते. विशेष म्हणजे हे एटीएमदेखील पहाटे तीन वाजेच्या दरम्यान फोडण्यात आले होते. या चोरीचा अद्याप तपास लागलेला नसतानाच शेजारीच असलेल्या संगमनेर तालुक्यातील समनापूर येथे लोणीची पुनरावृत्ती झाली आहे. या प्रकरणी संगमनेर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांन विरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. सध्या अहमदनगर जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हेही वाचा - Aurangabad Honour Killing : औरंगाबादमध्ये सैराटची पुनरावृत्ती! प्रेमविवाह केला म्हणून सख्या भावानेच केली बहिणीची हत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.