विश्व तिरंदाजी: भारताला पुन्हा सुवर्णपदकाची हुलकावणी, तीन रौप्य पदकावर समाधान

author img

By

Published : Sep 26, 2021, 6:34 PM IST

World Archery championship: india wins three silver

भारतीय तिरंदाज ज्योती सुरेखा वेनाम हिला विश्व चॅम्पियनशीपमध्ये रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

यांकटन - भारतीय तिरंदाज ज्योती सुरेखा वेनाम हिला विश्व चॅम्पियनशीपमध्ये रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. कंपाउड महिला वैयक्तिक गटाच्या अंतिम फेरीत चुरशीच्या झालेल्या सामन्यात तिसऱ्या मानांकित कोलंबियाच्या सारा लोपेज हिने तिचा पराभव केला.

वैयक्तिक पुरूष कंपाउड गटात अभिषेक वर्माला शनिवारी नेदरलँडच्या जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या माइक स्क्लोसेर याने पराभव केला. माइकने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात 148-147 अशी बाजी मारली. भारताने कंपाउड तिरंदाजी गटात एकूण तीन रौप्य पदक जिंकले. अंकिता भगत रिकर्व वर्गात आज रविवार खेळणार आहे.

ज्योती वेनाम भारताचा महिला आणि मिश्र युगल कंपाउड तिरंदाजी संघाची भाग होती. या संघाचा शुक्रवारी कोलंबियाविरुद्दच्या सामन्यात एकतर्फा पराभव झाला आणि त्यांना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

भारताला अद्याप या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकता आलेले नाही. भारताने या स्पर्धेत 11 वेळा पोडियमवर स्थान मिळवले. पण यात भारतीय खेळाडूंना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले आहे.

हेही वाचा - IPL 2021 : पंजाब किंग्सने केवळ पाच धावांनी केला सनरायझर्स हैदराबादचा पराभव

हेही वाचा - KKR VS CSK : केकेआरचे चेन्नईसमोर विजयासाठी 172 धावांचे आव्हान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.