आंतरराष्ट्रीय नेमबाजाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या, कारण अस्पष्ट

author img

By

Published : Sep 14, 2021, 10:30 PM IST

National-level shooter Namanveer Singh Brar found dead with bullet wound

आंतरराष्ट्रीय नेमबाज नमनवीर सिंग बरार याने सोमवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. त्याच्या घरातून कोणतीही सुसाईट नोट मिळालेली नाही. तो मागील काही दिवसांपासून तणावात होता, अशी माहिती मिळत आहे.

चंढीगढ - आंतरराष्ट्रीय नेमबाज नमनवीर सिंग बरार याने सोमवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. नमनवीर याने आपल्याकडे असलेल्या परवानाधारक बंदुकीने स्वत:वर गोळी झाडली. त्याच्या घरातून कोणतीही सुसाईट नोट मिळालेली नाही. तो मागील काही दिवसांपासून तणावात होता, अशी माहिती मिळत आहे. पोलीस नमनवीरच्या आत्महत्येचे कारण शोधत आहेत.

नमनवीर याचे वडिल अरविंदर सिंग बरार हे फरिदकोट येथील व्यापारी आहेत. त्यांनी नमनवीरला नेमबाजीसाठी सतत प्रोत्साहित केले. मुलाला त्रास होऊ नये यासाठी ते 2009 मध्ये फरिदकोटहून मोहाली सेक्टर-71 मध्ये स्थायिक झाले. येथे नमनवीर नेमबाजीचा सराव करत होता. 2020 मध्ये त्याचे लग्न झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटेच्या सुमारास नमनवीरच्या कुटुंबीयांनी अचानक गोळीचा आवाज ऐकला. तेव्हा ते नमनवीरच्या खोलीकडे धावले. तिथे त्यांना नमनवीर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहायला मिळाला. गोळी त्याच्या डोक्याच्या आरापार झाली होती. बाजूला बंदूक पडलेली होती.

कुटुंबीयांनी नमनदीपला उचलून रुग्णालयात दाखल केले. तेव्हा डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला. सायंकाळी शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयाकडे सोपवण्यात आले.

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, नमनवीर रविवारी रात्री कुठेतरी पार्टीला गेला होता. तो पार्टीतून उशिरा रात्री घरी परतला. घरी तो आपल्या खोलीत झोपला होता. पहाटे गोळीच्या आवाजाने सर्व कुटुंबीय जागे झाले.

नमनवीर याने 2015 दक्षिण कोरियामध्ये झालेल्या विश्व यूनिवर्सिटी स्पर्धेत डबल ट्रॅप संघात भाग घेतला होता. यात त्याने कास्य पदक जिंकले. याच वर्षी त्याने ऑल इंडिया यूनिर्वसिटीज शुटिंग चॅम्पियनशीपमध्ये कास्य पदकाला गवसणी घातली. यानंतर त्याने पोलंडमध्ये झालेल्या विश्व शुटिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत कास्य पदक जिंकले. नमनवीरने या वर्षी मार्च महिन्यात दिल्ली येथे झालेल्या नेमबाजी विश्व कप स्पर्धेत चौथे स्थान पटकावले होते.

हेही वाचा - US Open Final : रागात तोडलं रॅकेट; पराभव समोर पाहून ओक्साबोक्सी रडू लागला नोवाक जोकोविच

हेही वाचा - यॉर्कर स्पेशालिस्ट लसिथ मलिंगाची क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.