CWG 2022: लॉन बॉल स्पर्धेत पुरुष संघ रौप्य पदकाचा मानकरी

author img

By

Published : Aug 6, 2022, 9:11 PM IST

Indian lawn bowls team won the silver medal

भारताच्या लॉन बॉल्स संघाने ( lawn Bawl team of India ) रौप्य पदक ( lawn Bawl team of India won silver medal ) जिंकले. त्यांना अंतिम फेरीत उत्तर आयर्लंडविरुद्ध पराभव स्वीकारावा ( Indian lawn bowls team lost against Northern Ireland ) लागला होता. भारताकडून या सामन्यासाठी सुनील बहादूर, नवनीत सिंग, चंदनकुमार सिंग आणि दिनेश कुमार मैदानात होते.

बर्मिंगहॅम: लॉन बॉलच्या शेवटच्या सामन्यात पुरुष संघाला (चार खेळाडू) नॉर्दर्न आयर्लंडविरुद्ध पराभवाचा सामना ( Indian lawn bowls team lost against Northern Ireland ) करावा लागला. त्यामुळे भारतीय संघाला रौप्यपदकावर समाधान ( mens team won silver medal in lawn bawl ) मानावे लागले आहे. 14व्या शेवटानंतर भारतीय संघाने ( Indian lawn bowls team ) हा सामना 18-5 ने गमावला. सुनील बहादूर, नवनीत सिंग, चंदन कुमार सिंग आणि दिनेश कुमार या जोडीने भारतासाठी आश्चर्यकारक कामगिरी केली आहे.

शरथ कमल, श्रीजा अकुला अंतिम फेरीत - त्याचबरोबर शरथ कमल आणि श्रीजा अकुला या जोडीने टेबल टेनिसमध्ये अंतिम फेरी गाठली आहे. भारतीय जोडीने उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियन जोडीचा 11-9, 11-8, 9-11, 12-14, 11-7 असा पराभव करत किमान रौप्यपदक निश्चित केले.

भारताचे पदक विजेते :

  • 9 सुवर्ण: मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली, महिला लॉन बॉल संघ, टेबल टेनिस पुरुष संघ, सुधीर (पॉवर लिफ्टिंग), बजरंग पुनिया, साक्षी मलिक, दीपक पुनिया
  • 11 रौप्य: संकेत सरगरी, बिंदियाराणी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ, तुलिका मान, मुरली श्रीशंकर, अंशु मलिक, प्रियांका, अविनाश साबळे, पुरुष लॉन बॉल संघ
  • 9 कांस्य: गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंग, सौरव घोषाल, गुरदीप सिंग, तेजस्वीन शंकर, दिव्या काकरन, मोहित ग्रेवाल

हेही वाचा - CWG 2022 INDW vs ENGW : कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय महिला संघाचे पदक निश्चित; इंग्लंड संघाला 4 धावांनी चारली धूळ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.