Tokyo Olympic : पराभवानंतर महिला हॉकी कर्णधार राणी रामपालची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली...

author img

By

Published : Aug 6, 2021, 4:49 PM IST

tokyo olympic 2020 : rani-rampal-said-being-fourth-in-olympics-is-not-a-small-matter-but-regrets-missing-a-medal

ग्रेट ब्रिटनविरुद्ध झालेल्या पराभवानंतर भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल हिने आम्ही सामन्यात सर्वश्रेष्ठ दिल्याची प्रतिक्रिया दिली.

टोकियो - भारतीय महिला हॉकी संघाला कास्य पदकासाठी झालेल्या सामन्यात ग्रेट ब्रिटनकडून पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर भारतीय संघाचे टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदकाचे स्वप्न धुळीस मिळाले. भारताच्या पराभवानंतर कर्णधार राणी रामपालने प्रतिक्रिया दिली आहे.

सामना संपल्यानंतर कर्णधार राणी रामपाल म्हणाली की, आम्ही खूप निराश आहोत. कारण आम्ही पदकाच्या खूप जवळ होते. आम्ही 2-0ने पिछाडीवर होते. त्यानंतर आम्ही बरोबरी साधली आणि 3-2 ने आघाडी देखील मिळवण्यात यशस्वी ठरलो. मला कळत नाहीये की, काय बोलावं. पण खूप दुख होत आहे. कारण आम्ही कास्य पदक जिंकू शकलो नाही.

आम्ही आमचं सर्वश्रेष्ठ दिलो. यामुळे मला संघाचा गर्व आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत खेळणे आणि अव्वल चारमध्ये स्थान मिळवणे ही सोपी गोष्ट नाही. आम्ही मोठा पल्ला गाठला, असे देखील राणी रामपाल हिने सांगितलं.

मी सर्व देशवासियांचे आभार मानते. कारण त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला. आमच्यावर विश्वास दाखवला. मला आशा आहे की, आम्ही कास्य पदक जिंकण्यात अपयशी ठरलो असलो तरी ते आम्हाला कायम पाठिंबा देतील, असे सांगत राणीने देशवासियांचे आभार मानले. आम्हाला देशाकडून अशाच पाठिंब्याची गरज आहे, असे देखील राणी म्हणाली.

दरम्यान, भारतीय संघ दुसऱ्या क्वार्टरमध्ये 2-0 ने पिछाडीवर होता. तेव्हा गुरजीत कौर हिने दोन करत भारतीय संघाला बरोबरी साधून दिली होती. यानंतर वंदना कटारिया हिने आणखी एक गोल करत भारताला आघाडीवर आणले होते. परंतु ग्रेट ब्रिटनच्या खेळाडूंनी तिसऱ्या आणि चौथ्या क्वार्टरमध्ये 15 मिनिटाच्या अंतरात दोन गोल करत 4-3 ने आघाडी घेतली. त्यानंतर भारतीय संघाला बरोबरी साधता आली नाही. यामुळे भारताचा पराभव झाला.

हेही वाचा - Tokyo Olympic : भारताला जबर धक्का, बजरंग पुनियाचा उपांत्य फेरीत पराभव

हेही वाचा - राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराला आता मेजर ध्यानचंद यांचे नाव; मोदींची घोषणा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.