रूपिंदर पाठोपाठ स्टार डिफेंडर बिरेंद्र लाकराची हॉकीमधून निवृत्ती

author img

By

Published : Sep 30, 2021, 4:40 PM IST

Olympic Bronze Medallist and Indian Hockey Teams Star Birendra Lakra Announces Retirement

भारतीय पुरूष हॉकी संघाचा खेळाडू बिरेंद्र लाकरा याने हॉकीमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. बिरेंद्रच्या आधी ड्रॅग फ्लिकर रूपिंदर पाल सिंह याने निवृत्तीची घोषणा केली आहे. बिरेंद्र आणि रूपिंदर हे टोकियो ऑलिम्पिक पदक विजेत्या भारतीय संघाचे सदस्य आहेत.

भुवनेश्वर - टोकियो ऑलिम्पिकमध्ये कास्य पदक जिंकणाऱ्या भारतीय पुरूष हॉकी संघाचा खेळाडू बिरेंद्र लाकरा याने हॉकीमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. बिरेंद्रच्या काही तास आधी ड्रॅग फ्लिकर रूपिंदर पाल सिंह याने निवृत्तीची घोषणा केली आहे. बिरेंद्रने भारतासाठी 201 सामने खेळली आहेत.

हॉकी इंडियाने ट्विटच्या माध्यमातून बिरेंद्र लाकराच्या निवृत्तीची माहिती दिली. एचआयने ट्विट करत सांगितलं की, एक चांगला डिफेंडर आणि भारतीय पुरूष हॉकी संघाचा मजबूत सदस्य, ओडिशाचा स्टारने भारताच्या राष्ट्रीय संघातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. हॅप्पी रिटायरमेंट बिरेंद्र लाकरा.

ओडिशाच्या राउरकेला येथील रहिवाशी बिरेंद्रने हॉकी कारकिर्दीची सुरूवात हॉकी अकादमीतून केली. तो दिलीप तिर्की यांना आपला आदर्श मानतो. दिलीप यांना पाहून त्याने हॉकी शिकली. 2009 एफआयएच ज्यूनियर विश्व कपसाठी सिंगापूरला गेलेल्या भारतीय संघाचा बिरेंद्र सदस्य होता. त्याने पहिल्यांदा 2007 मध्ये ज्यूनियर संघात पाऊल ठेवले. ज्यूनियर स्तरावर त्याने चांगली कामगिरी केल्याने त्याला सीनियर संघात संधी मिळाली.

भारतीय पुरूष हॉकी संघाने 2012 मध्ये चॅम्पियन ट्रॉफी आणि अशिया कप 2013 मध्ये रौप्य पदक जिंकले होते. या दोन्ही स्पर्धेत बिरेंद्र भारतीय संघाचा सदस्य होता. याशिवाय जकार्ता आशियाई स्पर्धेत कास्य पदक विजेता संघासोबत तो होता. तसेच भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कास्य पदक जिंकले. या संघात देखील बिरेंद्र होता.

हेही वाचा - लग्नासाठी कशी मुलगी हवी? नीरज चोप्राने लाजून दिलं उत्तर

हेही वाचा - भारतीय स्टार ड्रॅग फ्लिकर रूपिंदर पाल सिंहची आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्तीची घोषणा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.