अखेर वाघाने दिले सचिन तेंडुलकरला दर्शन

author img

By

Published : Sep 7, 2021, 8:43 PM IST

Updated : Sep 7, 2021, 9:01 PM IST

http://10.10.50.85//maharashtra/07-September-2021/mhchd01chimurvis_07092021193703_0709f_1631023623_863.jpg

सचिन तेंडुलकर पत्नी अंजलीसह तिसऱ्यांदा ताडोबाला भेट देण्यासाठी आला. त्याने मदनापूर, अलीझंजा, सिरकाळा बफर झेत्रात सफारी केली. यावेळी त्याला पाटलीनबाई वाघीणीचे दोन बछडे आणि छोटी राणी वाघीणीचे दर्शन झाले.

चिमूर (चंद्रपूर ) - भारतीय संघाचा माजी दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकर तिसऱ्यांदा ताडोबातील वाघांच्या भेटीला आला. त्याने मदनापूर, अलीझंजा, सिरकाळा बफर क्षेत्रात सफारी केली. यात त्याला सिरकाळा बफरमध्ये पाटलीनबाई वाघीणीचे दोन बछडे आणि छोटी राणी वाघीणीचे दर्शन झाले. या दर्शनानंतर सचिन आज मुंबईकडे रवाना झाला आहे.

सचिन तेंडुलकर पत्नी अंजली तसेच काही मित्रासोबत ताडोबाला आला. तो कोलारा गेट मार्गावरील तुकुम येथील बाँम्बु रिसोर्टमध्ये शनिवार ४ सप्टेंबरपासून मुक्कामाला होता. आल्यापासून त्याने मदनापुर बफरमध्ये तीन तर सिरकाळा बफरमध्ये दोन वेळा आणि अलिझंजा बफरमध्ये एक अशा सहा सफाऱ्या केल्या. मात्र ६ सप्टेंबर पर्यंत त्याला वाघाचे दर्शनच झाले नाही. अखेर ७ सप्टेंबर रोजी सकाळच्या सिरकाळा बफरमध्ये पाटलीनबाई वाघीणीचे दोन बछडे आणि छोटी राणी वाघीनीचे त्याला दर्शन झाले. वाघाचे दर्शन घेऊन तो सायंकाळी ४.३० वाजता नागपूरकडे स्वत: गाडी चालवत रवाना झाला.

छोटी रानीच्या दर्शनाने सचिनचा ताडोबाला निरोप
सचिन कृतिकाला स्वाक्षरी देताना

आंतरराष्ट्रीय किर्तीच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या मोहात सचिन तेंडुलकर पडला आहे. त्यामुळे तो तिसऱ्यांदा ताडोबा सफारी करीता पत्नी अंजली, क्रिकेटर प्रशांत वैद्य आणि सब्रोतो बॅनर्जी यांच्यासह काही मित्रांसोबत आला. त्याने 4 सप्टेंबर ते 6 सप्टेंबरपर्यंत पाच सफाऱ्या केल्या. यात त्याला वाघाचे दर्शन झाले नाही. मात्र सचिनने जिद्द न सोडता 7 सप्टेंबर रोजी सकाळी सिरकाळा येथे सफारी केली. या सफारीत सचिनला छोटी राणी वाघीण, पाटलीनबाई वाघीणीचे वाढलेले दोन बछडे, एक बिबट आणि आठ रानकुत्रांचे दर्शन झाले.

सचिन काय म्हणाला...

वाघाच्या दर्शनाने आनंदीत होऊन रिसोर्ट सोडताना सचिन पत्रकारांना म्हणाला, ताडोबा व्याघ्र प्रकल्प ही खूप छान जागा आहे. येथे आल्यानंतर आनंद होतो. तसेच येथील माणसे सुद्धा खूप चांगली आहेत.

सचिन तेंडुलकर

भारतीय संघाने इंग्लंड विरुद्धचा चौथा कसोटी सामना जिंकला. याविषयी पत्रकाराने विचारले असता, तो म्हणाला की, भारत बाहेर कुठेही जाऊन विजयी झाला तर याचा आनंद होतोच.

सचिनच्या दर्शनाने कृतिका भारावली

नागपुरमधून एक पोलीस कर्मचारी आपल्या दोन मुली कृतिका आणि काजल यांच्यासह सचिन तेंडुलकरला भेटायला आला होता. त्याने सांगितलं की, या मुली सचिनच्या फॅन आहेत. ते खूप वेळापासून सचिनची वाट पाहत होते. सचिन जेव्हा रिसोर्टमधून बाहेर पडला. तेव्हा 11 वर्षीय कृतिकाने सचिनला स्वाक्षरी मागितली. तेव्हा सचिन देखील चिमुकलीचा आग्रह मोडू शकला नाही. त्याने कृतिकाने आणलेल्या बॅटवर स्वाक्षरी दिली. यासोबत त्याने कृतिकाला गुड लक म्हणत भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तेव्हा कृतिकाने सचिनच्या पाया पडत एकप्रकारे आभार मानलं.

कृतिका बोलताना

हेही वाचा - सचिन तेंडुलकर पत्नी अंजलीसह करतोय ताडोबा व्याघ्र प्रकल्पाची सफर

हेही वाचा - 'पांचसो में बिक जाओगे तो ऐसाही रोड पाओगे'; चंद्रपुरातील खड्डेमय रस्त्यांवर अनोखे आंदोलन

Last Updated :Sep 7, 2021, 9:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.