PAK vs WI ODI Series : पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज एकदिवसीय मालिका रावळपिंडीहून हलवली, जाणून घ्या काय आहे कारण

author img

By

Published : May 31, 2022, 5:19 PM IST

Pakistan

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पुढील महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्धची एकदिवसीय मालिका रावळपिंडीऐवजी मुलतानमध्ये घेण्याचा निर्णय घेतला ( ODI series shifted rawalpindi to multan ) आहे. कारण विरोधी पक्षांच्या निषेधाच्या रॅलीच्या शक्यतेमुळे घेण्यात आला आहे.

मुलतान: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) वेस्ट इंडिजविरुद्धची तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका ( PAK vs WI ODI Series ) रावळपिंडीहून मुलतानला हलवली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) मंगळवारी ही माहिती दिली. ही मालिका क्रिकेट विश्वचषक सुपर लीग सामन्यांचा एक भाग आहे. हे सामने 8, 10 आणि 12 जून रोजी होणार आहेत. दुपारची उष्णता टाळण्यासाठी सर्व सामने स्थानिक वेळेनुसार दुपारी 4 वाजता सुरू होतील.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पुढील महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्धची एकदिवसीय मालिका ( Pakistan vs West Indies Odi Series ) रावळपिंडीऐवजी मुलतानमध्ये घेण्याचा निर्णय घेतला आहे. कारण विरोधी पक्षांच्या राजकीय निषेधाच्या रॅलीच्या शक्यतेमुळे घेतला आहे.

ही मालिका मूळतः गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये खेळली जाणार होती, परंतु वेस्ट इंडिजच्या कॅम्पमध्ये कोविड-19 च्या उद्रेकामुळे ती पुढे ढकलण्यात आली. त्याआधी खेळलेल्या टी-20 मालिकेत पाकिस्तानने 3-0 ने विजय मिळवला होता. पाकिस्तान 1 जूनपासून लाहोरमध्ये प्रशिक्षण शिबिर आयोजित करेल आणि 5 जूनला मुलतानला रवाना होईल. काऊंटी क्रिकेटमध्ये भाग घेणारे हारिस रौफ आणि शादाब खान ( Harris Rauf and Shadab Khan ) हे दोघेही या मालिकेसाठी वेळेवर येण्याची अपेक्षा आहे.

वेस्ट इंडिजचा संघ 6 जूनला इस्लामाबादला पोहोचेल. त्यानंतर चार्टर विमानाने मुलतानला जाईल. याआधी ही मालिका पुन्हा पुढे ढकलली जाईल, अशी अटकळ होती. त्यामुळे पीसीबीला स्पष्टीकरण द्यावे लागले की मालिका पुढे ढकलण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही.

हेही वाचा - Asia Cup : दक्षिण कोरियाला हरवून भारत आशिया कपच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी उतरणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.