टी-20 विश्वकरंडक स्पर्धेआधी पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप, मिसबाह उल हकसह वकार युनूसचा राजीनामा

author img

By

Published : Sep 6, 2021, 5:35 PM IST

pakistan-head-coach-misbah-ul-haq-steps-down-and-waqar-younis-quits-as-bowling-coach

मिसबाह उल हक आणि वकार युनूस यांनी पाकिस्तान संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. मिसबाह मुख्य प्रशिक्षक होता. तर वकार युनूस गोलंदाजी प्रशिक्षक होता.

कराची - पाकिस्तान क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक मिसबाह उल हक आणि गोलंदाजी प्रशिक्षक वकार युनूस यांनी टी-20 विश्वकरंडक स्पर्धेआधी पाकिस्तान बोर्डाला मोठा धक्का दिला आहे. त्यांनी आपापल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पीसीबीने या वृत्ताला दुजारो दिला आहे. माजी खेळाडू सकलेन मुस्ताक आणि अब्दुल रज्जाक यांना पाकिस्तान संघाचे नवे प्रशिक्षक म्हणून नेमण्यात आले आहे.

मिसबाह उल हक याने सांगितलं की, कुटुंबीयांपासून दूर राहत मला बायो-बबलमध्ये खूप काळ घालववा लागणार आहे. परंतु मी कुटुंबीयासोबत राहू इच्छित आहे. यामुळे मी प्रशिक्षक पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.

दुसरीकडे वकार युनूस याने सांगितलं की, जेव्हा मला मिसबाह उल हक याने त्याचा निर्णय आणि पुढील भविष्यातील योजनाबद्दल सांगितलं, तेव्हा राजीनामा देण्याचा माझा निर्णय सोपा झाला. कारण आम्ही दोघांनी एकत्रित काम केले आहे. आता आम्ही एकत्रितच या पदावरून बाजूला होत आहोत.

पीसीसीने सांगितलं की, सकलेन मुस्ताक आणि अब्दुल रज्जाक हे न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी पाकिस्तान संघाच्या प्रशिक्षकपदाची भूमिका पार पडतील. दरम्यान, मिसबाह उल हक आणि वकार युनूस यांना सप्टेंबर 2019 मध्ये नियुक्त करण्यात आले होते. अद्याप त्याचा कार्यकाळ एक वर्षांनी शिल्लक आहे. परंतु त्याआधीच त्या दोघांनी राजीनामा दिला आहे.

न्यूझीलंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात उभय संघामध्ये 3 एकदिवसीय आणि 5 टी-20 सामन्याची मालिका खेळवली जाणार आहे. न्यूझीलंडचा संघ या दौऱ्यासाठी 11 सप्टेंबर रोजी पाकिस्तानमध्ये दाखल होईल. तर पाकिस्तानचे खेळाडू या दौऱ्यासाठी 8 सप्टेंबर रोजी इस्लामाबाद येथे एकत्रित जमणार आहेत.

हेही वाचा - England vs India : अखेरच्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी 291 धावांची गरज

हेही वाचा - जसप्रीत बुमराहचे 'प्लेयर ऑफ द मंथ' पुरस्कारासाठी नामांकन, हे खेळाडू शर्यतीत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.