IPL 2023 : चेन्नई पोहचली प्लेऑफमध्ये, दिल्लीचा 77 धावांनी दारुण पराभव, दीपक चहरने घेतले तीन बळी

author img

By

Published : May 20, 2023, 4:02 PM IST

Updated : May 20, 2023, 7:30 PM IST

Delhi Capitals vs Chennai Super Kings

आज झालेल्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्सचा 77 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 20 षटकांत 223-3 धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्लीचा संघ 20 षटकांत 9 गड्यांच्या मोबदल्यात केवळ 146 धावा करू शकला. या विजयासह चेन्नई सुपर किंग्जचा संघ प्लेऑफसाठी पात्र झाला आहे.

नवी दिल्ली : आयपीएल 2023 मध्ये आज दिल्ली कॅपिटल्सचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी होता. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 20 षटकांत 223-3 धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्लीचा संघ 20 षटकांत 9 गड्यांच्या मोबदल्यात केवळ 146 धावाच करू शकला.

  • 𝙇𝙚𝙩 𝙩𝙝𝙚 𝙬𝙝𝙞𝙨𝙩𝙡𝙚𝙨 𝙗𝙚𝙜𝙞𝙣 🥳

    𝗖𝗛𝗘𝗡𝗡𝗔𝗜 𝗦𝗨𝗣𝗘𝗥 𝗞𝗜𝗡𝗚𝗦 have qualified for the #TATAIPL 2023 Playoffs 💪🏻#DCvCSK | @ChennaiIPL pic.twitter.com/xlSNgjq09B

    — IndianPremierLeague (@IPL) May 20, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

डेव्हिड वॉर्नरची एकाकी झुंज : दिल्लीकडून कर्णधार डेव्हिड वॉर्नरने एकाकी झुंज देत 58 चेंडूत 86 धावा केल्या. आपल्या या खेळीत त्याने 7 चौकार आणि 5 षटकार लगावले. दिल्लीचे इतर फलंदाज मात्र चेन्नईच्या गोलंदाजांसमोर सपशेल अपयशी ठरले. चेन्नईकडून दीपक चहरने 4 षटकातं 22 धावा देत 3 विकेट घेतल्या. तर महेश तीक्षा आणि मथीशा पाथीरानाने प्रत्येकी 2-2 बळी घेतले.

चेन्नईच्या सलामीवीरांचे अर्धशतके : चेन्नईकडून सलामीवीर डेव्हॉन कॉनवे आणि ऋतुराज गायकवाडने शानदार खेळी खेळली. कॉनवेने 52 चेंडूत 11 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 87 धावा केल्या. तर गायकवाडने 50 चेंडूत 3 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 79 धावांचे योगदान दिले. दिल्लीकडून खलील अहमद, अक्षर पटेल आणि चेतन साकरियाने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग 11) : डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), रिली रोसोव, यश धुल, अमन हकीम खान, अक्षर पटेल, ललित यादव, कुलदीप यादव, चेतन साकारिया, खलील अहमद, एनरिक नॉर्टजे ; इम्पॅक्ट प्लेअर्स - मुकेश कुमार, पृथ्वी शॉ, प्रवीण दुबे, रिपल पटेल आणि अभिषेक पोरेल.

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग 11) : ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, महेश तीक्षा ; इम्पॅक्ट प्लेअर्स - मथीशा पाथीराना, मिचेल सँटनर, सुब्रांशू सेनापाठी, शेख रशीद आणि आकाश सिंग.

महेद्रसिंह धोनी : आम्ही प्रथम फलंदाजी करू. आम्ही पहिल्या मॅचपासून जिंकण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही एकच टीम खेळवत आहोत. ही संतुलित टीम आहे. त्यामुळे आम्हाला जास्त बदल करण्याची गरज नाही. ही दिवसाची मॅच आहे. त्यामुळे सामना जसजसा पुढे जाईल तसतशी खेळपट्टी मंद होईल. त्यामुळेच आम्हाला प्रथम फलंदाजी करायची आहे. अशा टूर्नामेंटमध्ये, आम्हाला प्रत्येक मॅचमधून शिकण्याची गरज आहे. तेच संघातील खेळाडूंनी शिकावे ,अशी माझी इच्छा आहे.

डेव्हिड वॉर्नर : आम्ही अद्याप घरच्या परिस्थितीत सेटल झालो नाही, पण आज आणखी एक संधी आहे. ललित यादव टीममध्ये येतो आहे. चेतन साकरियाही येतो आहे. इशांत शर्मा बाहेर गेला आहे. धर्मशाळेतील मोठ्या विजयानंतर आम्हाला येथे नव्याने सुरुवात करावी लागेल.

हेही वाचा :

  1. IPL 2023 : राजस्थान रॉयल्सचा पंजाब किंग्जवर ४ विकेट्स राखून विजय
  2. IPL 2023 : ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये डु प्लेसिसला पछाडणे कठीण, पर्पल कॅपसाठी चुरस
  3. Virat Kohli Video Calls To Anushka : शतक झळकावल्यानंतर विराट कोहलीने केला पत्नी अनुष्काला व्हिडिओ कॉल
Last Updated :May 20, 2023, 7:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.