IPL Media Rights 2023-2027 : दोन स्वतंत्र प्रसारकांना मिळाले भारतीय उपखंडासाठी टीव्ही आणि डिजिटल अधिकार

author img

By

Published : Jun 14, 2022, 4:17 PM IST

IPL

स्टारने भारतीय उपखंडातील टीव्ही हक्क ( TV Rights ) 23,575 कोटी रुपयांना विकत घेतले आहेत आणि रिलायन्सच्या वायकॉम 18 ने 20,500 कोटी रुपयांना डिजिटल अधिकार ( Digital Rights ) विकत घेतले आहेत.

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग ( IPL ) सायकल 2023 ते 2027 साठी मीडिया हक्कांच्या ई-लिलावाच्या दुसऱ्या दिवशी, दोन वेगवेगळ्या प्रसारकांनी सोमवारी त्यांचे टीव्ही (पॅकेज ए) आणि डिजिटल अधिकार (पॅकेज बी) भारतीय उपखंडासाठी हक्क आपल्या नावी केले. पहिल्या दोन दिवसांत भारतीय उपखंडासाठी टीव्ही आणि डिजिटल अधिकारांचा लिलाव झाला आहे. या दोन श्रेणींचे हक्क 44,075 कोटी रुपयांना विकले गेले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्टारने भारतीय उपखंडातील टीव्ही हक्क ( Disney Star gets TV rights ) 23,575 कोटी रुपयांना विकत घेतले आहेत आणि रिलायन्सची कंपनी वायाकॉम ( Reliance's company Viacom ) 18 ने 20,500 कोटी रुपयांना डिजिटल अधिकार विकत घेतले आहेत.

रविवारी सुरू झालेला ई-लिलाव मंगळवारी तिसर्‍या दिवशीपर्यंत वाढला, त्यातील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे पाच वर्षांच्या चक्रात 410 सामने प्रसारित होणारे होते. प्रत्येक आयपीएल सामन्याचे एकूण मूल्य 107.5 कोटी रुपये आहे. आज C आणि D पॅकेजेसची बोली पूर्ण केली जाऊ शकते आणि विजेत्या कंपन्यांची नावे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) अधिकृतपणे जाहीर करु शकतात.

स्टार इंडिया-डिज्नी ( Star India-Disney ) कडे 2017-22 सायकलसाठी आयपीएल हक्कांचे वर्तमान धारक होते, ज्याने सप्टेंबर 2017 मध्ये टीव्ही आणि डिजिटल दोन्हीसाठी 16,347.50 कोटी रुपयांची विजयी बोली लावली होती. याआधी, सोनी पिक्चर्स नेटवर्क्सने 10 वर्षांच्या कालावधीसाठी 8,200 कोटी रुपयांची बोली लावून स्पर्धेच्या प्रारंभी आयपीएल टीव्ही मीडिया हक्क जिंकले होते.

  • पॅकेज-ए, मूळ किंमत रु. 49 कोटी प्रति सामना: भारतीय उपखंड विशेष टीव्ही (प्रसारण) हक्क.
  • पॅकेज-बी, मूळ किंमत 33 कोटी रुपये प्रति सामना: यामध्ये भारतीय उपखंडासाठी डिजिटल अधिकार आहेत.
  • पॅकेज-सी, मूळ किंमत रु. 11 कोटी प्रति सामना: प्रत्येक हंगामातील 18 निवडक सामन्यांच्या डिजिटल अधिकारांसाठी आहे.
  • पॅकेज-डी, मूळ किंमत 3 कोटी रुपये प्रति सामना: (सर्व सामने) परदेशी बाजारपेठेसाठी टीव्ही आणि डिजिटलसाठी एकत्रित अधिकार असतील.

हेही वाचा - IND vs SA 3rd T-20 : भारतासमोर आज मालिका वाचवण्याचे आव्हान, तर दक्षिण आफ्रिका मालिका जिंकण्यास सज्ज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.